Goa Culture Dainik Gomantak
गोवा

Goa Culture: त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विठ्ठलापूर साखळीत नौकानयन स्पर्धेची जय्यत तयारी

विठ्ठलापूर साखळी येथे दरवर्षीप्रमाणे साजऱ्या करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय त्रिपुरारी पौर्णिमा व नौकानयन स्पर्धेची जय्यत तयारी सुरू आहे.

Kavya Powar

विठ्ठलापूर साखळी येथे दरवर्षीप्रमाणे साजऱ्या करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय त्रिपुरारी पौर्णिमा व नौकानयन स्पर्धेची जय्यत तयारी सुरू आहे. वाळवंटी नदीकिनारी सध्या या सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना बसण्यासाठी खास स्टँन्ड उभारण्यात येत आहे.

संपूर्ण परिसराची साफसफाई करण्यात येत आहे. मंदिराच्या बाजूला खास व्यासपीठ व आसनव्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. गोवा राज्य कला व संस्कृती खाते, पर्यटन खाते, माहिती व प्रसिध्दी खाते, दिपावली उत्सव समिती विठ्ठलापूर साखळी यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या सोहळ्यात माहिती व प्रसिध्दी खात्यातर्फे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली साकारण्यात आलेल्या गोव्यातील ४० लक्षवेधी विकास प्रकल्पांच्या फोटोंचे दालन थाटण्यात येणार आहे.

नौकानयन स्पर्धेपूर्वी "उभा नटरंग" हा खास संगिताचा कार्यक्रम होणार आहे. नौकानयन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या आकर्षक नौकांचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. आमदार प्रेमेंद्र शेट यांनी या कामाची भेट देऊन पाहणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT