Goa Election: Prashant Kishor Dainik Gomantak
गोवा

Goa Election: तृणमूल काँग्रेसच्या गोव्यात हालचाली

तृणमूल कॉंग्रेस मोठ्या तयारीनिशी गोवा विधानसभा निवडणूकीत उतरणार

दैनिक गोमन्तक

पणजी: सध्या तृणमूल कॉंग्रेससाठी (Trinamool Congress) राजकीय (Politics) डावपेच लढवत असलेले राजनीतिज्ञ प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी गोव्यात (Goa) जोरदार हालचाली केल्याने एकच खळबळ उडाली आहे. कॉंग्रेसमधील एका गटासह भाजपाच्या आश्रयाला जाऊन सध्या अस्वस्थतेने घेरलेले दहाजण त्यांच्या गळाला लागल्याची चर्चा सुरू आहे.

काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते तृणमूल कॉंग्रेसमध्ये जाऊन राज्यसभापद पटकावण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त सध्या राज्यात फिरत असून, कॉंग्रेसचा एक आमदार व भाजपमधील दहाजण प्रशांत किशोर यांच्या संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले. मंत्री मायकल लोबो यांनी यावर प्रतिक्रिया देत गोव्याकडे देशातील पक्षांचे लक्ष असून तृणमूल काँग्रेस गोव्यात आली तर आश्चर्य काय, असे म्हटले आहे.

भाजपमधील दहा ख्रिस्ती आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यात उत्सुक असल्याची चर्चा राज्यात सुरू असतानाच तृणमूल कॉंग्रेस मोठ्या तयारीनिशी गोव्यात उतरणार असल्याचे वृत्त हाती आले आहे.

याच डावपेचांचा भाग म्हणून प्रशांत किशोर यांनी गेल्या आठवड्यात गोव्याला धावती भेट दिली. त्यांनी कॉंग्रेस व काही प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. किशोर यांच्या सर्वेक्षण संघटनेने यापूर्वीच राज्यात सर्वेक्षण करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांनी अनेक बुद्धिवाद्यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीची चाचपणी चालवली. ही संघटना आम्ही कोणत्याही राजकीय पक्षासाठी काम करीत नाही, असे सांगत असले तरी तृणमूल कॉंग्रेससाठीच ही मोर्चेबांधणी असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत बनले आहे.

प्रशांत किशोर यांची कसोटी

भाजपापासून दूर गेलेल्या किंवा गेल्या निवडणुकीत तिकीट नाकारलेले नेते व कार्यकर्ते यांच्या संपर्कात प्रशांत किशोर आहेत. कॉंग्रेस किंवा ‘आप’ या राजकीय पक्षांपेक्षा अधिक सूत्रबद्धरितीने प्रशांत किशोर पावले टाकत आहेत. ज्या राष्ट्रीय पक्षांना अस्तित्व नव्हते त्यांना सत्तेपर्यंत नेण्याचे राजकीय कौशल्य दाखवलेल्या प्रशांत किशोर यांची गोव्यात नवी कसोटी लागणार आहे. कारण गोवा चिमुकला आहे आणि त्यात येथील मतदारसंघ खूपच छोटे आहेत. परंतु असंतुष्टांना एकत्र केल्यास ते बलाढ्य राजकीय शक्तींनाही शह देऊ शकतात. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षात विखुरलेले असंतुष्ट यांना एकत्र करतानाच सत्ताधारी पक्षात नाराज असूनही आपला असंतोष व्यक्त करू न शकलेल्या घटकांना एकत्र करण्याची चाल प्रशांत किशोर खेळू पाहात आहेत. प्रशांत किशोर यांच्या या पवित्र्याने कॉंग्रेस नेतेही चकीत झाले असून, भाजपच्या जोरदार चढायांनाही शह बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशांत किशोर हे कॉंग्रेसपासून दूर झाल्याचीच ही परिणीती असून, ती कॉंग्रेसला गोव्यात मारक ठरू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT