Dog Shot In Navelim Goa Dainik Gomantak
गोवा

Margao Crime: अमानवी, क्रूर! मालमत्तेत घुसला म्हणून शेजाऱ्याच्या कुत्र्याला घातल्या 4 गोळ्या, मडगावात गुन्हा दाखल

Goa Crime News: कुत्र्याने शेजाऱ्याच्या मालमत्तेत प्रवेश केल्यानंतर संबधित मालकाने त्याच्यावर एअरगनच्या माध्यमातून चार गोळ्या झाडल्या.

Pramod Yadav

Goa Animal Cruelty :मडगाव: नावेली - बेले येथून एक धक्कादायक आणि तितकाच अमानवी आणि क्रूर प्रकार उघडकीस आला आहे. मालमत्तेत घुसला म्हणून शेजाऱ्याने कुत्र्याला चार गोळ्या घातल्याची घटना घडली आहे. यात कुत्रा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान, याप्रकरणी कुत्र्याच्या मालकांनी मडगाव दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नावेली - बेले येथे शेजाऱ्याच्या कुत्र्याने मालमत्तेत प्रवेश केला म्हणून एअरगनच्या चार गोळ्या कुत्र्याला घालण्यात आल्या. यात तीन गोळ्या कुत्र्याच्या पोटात तर एक गोळी त्याच्या डोक्यात लागली आहे. या हल्ल्यात कुत्रा गंभीर जखमी झाला असून, त्याच्या सर्वांगातून रक्त वाहत होते.

जखमी कुत्र्याला सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुत्र्याच्या मालकाने याप्रकरणी मडगाव पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून, संबधित व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कुत्र्याच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा शेजारी आणि त्यांच्यात नेहमीच वाद होत असतात. दरम्यान, कुत्र्याने शेजाऱ्याच्या मालमत्तेत प्रवेश केल्यानंतर संबधित मालकाने त्याच्यावर एअरगनच्या माध्यमातून चार गोळ्या झाडल्या.

वाद आमच्याशी आहे यात मुक्या प्राण्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा काय संबध होता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संबधित व्यक्ती कुत्र्याला गोळ्या घालत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

प्राणी प्रेमींकडून कृत्रीचा निषेध

मुक्या प्राण्यावर अशाप्रकारे जीवघेणा हल्ला करुन त्याला रक्तबंबाळ करणे अमानुषतेचा प्रकार असल्याची टीका प्रतिमा कुतिन्हो यांनी केली. याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'ढवळीकर झोपले त्यांना जागे करा'; मुख्यमंत्री कुसुमाग्रजांची कविता सादर करताना युरींची मिश्किल टिपण्णी अन् सभागृहात हशा पिकला

Goa Assembly Session: गोव्यात आता रॉटवेलर, पिटबुलला 'नो एन्ट्री'! विधानसभेत विधेयक संमत, बंदीचा मार्ग मोकळा

Goa Assembly Live: 'गोवा दावे मूल्यांकन विधेयक, 2025' विधानसभेत संमत; विरोधकांच्या सूचना विचारात घेण्याची मुख्यमंत्र्यांची हमी!

IND vs ENG 4th Test: अभिनंदन केएल राहुल! इंग्लंडमध्ये केला पुन्हा नवा पराक्रम; 'या' दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान

स्वप्न नव्हे, सत्य! आता 100 वर्षे जगा, साठीतही घ्या तरुणाईचा अनुभव; 'हे' 5 उपाय आहेत फायदेशीर, वैज्ञानिकांचा दावा

SCROLL FOR NEXT