Aashadhi Ekadashi Pandharpur Yatra
Goa To Pandharpur VaariDainik Gomantak

Goa Pandharpur Wari : गोव्यातून पंढरपूरला निघाली वारी; विठ्ठल - रुक्माईच्या नामघोषात वारकरी करणार 450 किलोमीटर पायी प्रवास

Aashadhi Ekadashi Pandharpur Yatra: पंढरपूरात जाणाऱ्या माऊली भक्तांसाठी सरकार गोवा भवन उभारणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
Published on

Pandharpur Wari News :पणजी: आषाढी एकदशीच्या वारीनिमित्त दहा मानाच्या पालख्या आणि वारकऱ्यांनी लाडक्या विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण सुरु केले आहे. महाराष्ट्रातून विविध वारकरी पंढरपूरला निघाला असताना गोव्यातून हजारो वारकरा पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. काणकोण, साखळीसह अनेक वारकऱ्यांनी गोव्यातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विठ्ठल रुक्माई माऊली वारकरी मंडळाच्या काणकोणच्या वारकऱ्यांनी शुक्रवारी (२० जून) सकाळी रथात विराजमान झालेल्या विठ्ठल रखुमाईचीची पूजा करून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले.

यावेळी काणकोणचे आमदार आणि सभापती रमेश तवडकर, काणकोणच्या नगराध्यक्ष सारा शंभा नाईक देसाई, माजी आमदार विजय पै खोत, वारकरी मंडळाचे प्रमुख नंददीप भगत, काणकोण नगरपालिकेतील नगरसेवक, सरपंच धील्लन‌ देसाई अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Aashadhi Ekadashi Pandharpur Yatra
इनडोको फार्माचा पुन्हा खोडसाळपणा; गोव्यातील नोकरीसाठी महाराष्ट्र, गुजरातमध्ये आयोजित केल्या मुलाखती

सर्वांनी एकत्रित येऊन वारकऱ्यांना पंढरपूर वारीसाठी शुभेच्छा दिल्या. २० जून ते ०३ जुलै सर्व वारकरी सुमारे साडेचारशे किलोमीटर पंढरपूर पर्यंतचा प्रवास पायी करणार आहेत.

साखळीतून देखील वारकऱ्यांचे प्रस्थान

Aashadhi Ekadashi Pandharpur Yatra
Air India Flights: अहमदाबाद दुर्घटनेनंतर एअर इंडियाचा मोठा निर्णय; गोवा ते लंडन विमानसेवा एक महिना स्थगित

आषाढी एकादशी वारीच्या निमित्ताने आमोणा, नावेली आणि विठ्ठलपूर वारकरी संप्रदायाच्या वतीने साखळीतील रविंद्र भवन येथे हरीपाठाचे आयोजन करण्यात आले होते. या हरीपाठात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सहभाग घेतला. गोव्यातून दरवर्षी पंढरपूरला वारकऱ्यांची दिंडी जात असते, पंढरपूरात जाणाऱ्या माऊली भक्तांसाठी सरकार गोवा भवन उभारणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com