Blue Taxi service  Dainik Gomantak
गोवा

Mauvin Godinho : मोपा विमानतळावर लवकरच ब्लू टॅक्सी सेवा; चालकांना वाहतूक, वागणूक प्रशिक्षण बंधनकारक

वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली माहिती

Rajat Sawant

Manohar International Airport : मोपा विमानतळावर 160 टॅक्सींसह ब्लू टॅक्सी सेवा लवकरच सुरु करण्यात येणार आहे. तसेच टॅक्सी चालकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

गोव्यातील टॅक्सी पात्राव योजना, माझी बस योजनेचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कौतूक केले आहे. या योजनेबाबत सविस्तर लवकरच मंत्री गडकरींशी चर्चा करणार आहे. तसेच ही योजना अन्य ठिकाणी लागू करणार असल्याचे मंत्री गडकरींनी सांगितल्याचे गुदिन्हो यांनी सांगितले.

सरकारने अधिसूचित केलेल्या दरांपेक्षा गोवा माईल्स टॅक्सीच्या दरांत 15 ते 20 टक्के घट करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी या टॅक्सी सेवेकडे वळत आहेत. गोव्याचा टॅक्सी पात्राव योजनेअंतर्गत पेडणेतील स्थानिक युवक कठोर परिश्रम करत टॅक्सी चालवून 50 ते 70 हजार रुपये महिना कमाई करीत आहेत. गोवेकार सुशेगात नसून गोव्यातील युवक हे कठोर परिश्रम करीत आहेत.

मोपा विमानतळावर 160 टॅक्सींसह ब्लू टॅक्सी सेवा लवकरच सुरु करण्यात येणार आहे. ते प्रीपेड टॅक्सीनुसार दर आकारणार आहेत. त्यांना ऍप बेस टॅक्सी सेवा सुरु करण्याचे मुभा आहे.

टॅक्सी चालकांना दोन आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ट्राफिक सिग्नल्स, पर्यटक प्रवाशांशी कसे वागावे याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे दोन आठवड्यांचे प्रशिक्षण निशुल्क व बंधनकारक आहे.

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी गोव्यातील टॅक्सी पात्राव योजना, माझी बस योजने बाबत चर्चा केली. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या योजनेचे कौतूक केले असून लवकरच या योजने बाबत सविस्तर चर्चा करुन ही योजना इतर ठिकाणी अवलंबणार असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितल्याचे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT