म्हापसा-गिरी रस्त्यावर पडलेल्या भगदाडाचे काम अपूर्णच; 'साबांखा'च्या कामावर स्थानिकांची नाराजी

नागरिकांनी नाराजी व्यक्त सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Mapusa-Guirim Road Work
Mapusa-Guirim Road WorkDainik Gomantak

Mapusa-Guirim Road Work: साधारण 8-9 महिन्यांपूर्वी म्हापसा-गिरी रस्त्यावरील पाण्याची पाईपलाईन फुटली असून त्यावेळी हजारो लीटर पाणी वाया गेले होते. त्यानंतर असाच प्रकार महिन्याभरापूर्वी घडला होता. म्हापसा-गिरी सर्विस रोडवरील पाईपलाईन फुटल्याने तिथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर तिथे रस्ता खचल्याचे काम अद्याप पूर्ण झाले नसून याबाबत परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Mapusa-Guirim Road Work
Valpoi News : वाळपईत मॉन्सूनपूर्व कामांचे तीनतेरा, अर्ध्याहून अधिक कामे अपूर्ण

काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावर मोठे भगदाड पडले होते. मात्र त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली असून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.

रस्त्याचे पूर्ण काम न करता थोडेसे काम करून त्यावर माती रचण्यात आली आहे. मात्र रस्त्याची एक बाजू खचल्याने आणि रस्त्यावर माती असल्याने वाहने तिथून खाली घसरून अपघात होण्याची भीती वाहनचालकांना वाटते.

तसेच तिथे असलेल्या पाईपलाईनमधून पाणी वायाच जात असून पाण्याची नासाडी रोखून हे काम वेळेत करण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्षच नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

भगदाड पडलेल्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाईपलाईन मधून सतत पाणी वाया जात आहे आणि दुसरीकडे तिथल्या भागातील घरांना मात्र पाण्याचा पुरवठा अनियमित होत असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे. सार्वजनिक विभाग या गोष्टींकडे लक्ष का देत नाही आणि अपघात घडल्यावरच सरकारला जाग येणार का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com