trailer truck Accident At Old Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: राज्यात दोन अपघात; शेडमध्ये झोपलेली चार लोकं सुदैवाने बचावली तर, ढवळीत कारची कंटेनरला धडक

ढवळीतील अपघातात कारचालक जखमी झाला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Truck And Car Accident In Goa: राज्यात अपघातांचे सत्र सुरुच आहे. शनिवारी राज्यात 3 अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. यातील पहिला अपघात सकाळी ओल्ड गोवा खोर्ली येथे ट्रकचा अपघात झाला. दुसरा अपघातात शिवोलीत मद्यधुंद अवस्थेत कारचालकाने विजेच्या खांबाला धडक दिली तर तिसरा अपघात ढवळीतील उड्डाणपूलावर झाला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ओल्ड गोव्यातील खोर्ली येथे ट्रकचा स्वयंअपघात झाला आहे. ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक एका शेडमध्ये घुसला. या शेडमध्ये काही लोकं झोपली होती. सुदैवाने या शेडमधील 4 लोकं बचावली. या धडकेत शेडचे नुकसान झाले तर ट्रकचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तर ढवळीतील उड्डाणपुलावर एका कारचा अपघात झाला आहे. या अपघातात कारच्या प्रथमदर्शनी भागाचे नुकसान झाले. उड्डाणपुलावर कारने ट्रकला पाठीमागून धडक दिली. या धडकेत कारचालक जखमी झाला असून चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तर शिवोलीत मद्दधुंद अवस्थेत मध्य प्रदेशातील पर्यटकाची भरधाव रेंट अ कार विजेच्या खांबाला जावून धडकली. या धडकेत कारचे नुकसान झाले. या अपघातानंतर परिसरात वाहतूक कोंडी झाली. तसेच धडकेत विजेच्या खांबाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा तात्पुरता खंडित झाला. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT