Traffic police action Goa Dainik Gomantak
गोवा

Traffic Police: गोव्यात वाहतूक पोलीस Action Mode वर; विनाहेल्मेट 708 दुचाकीस्वारांवर कारवाई, पार्किंगबद्दल 792 गुन्हे दाखल

Traffic police action Goa: मोटर वाहन कायद्याच्या कलम १८५ अंतर्गत मद्यधुंद वाहन चालवण्याचे एकूण १०३ गुन्हे नोंदवण्यात आले, ज्यामध्ये उत्तर गोव्यात ५८ तर दक्षिण गोव्यात ४५ गुन्हे दाखल झाले.

Sameer Panditrao

पणजी: वाहतूक पोलिसांनी गेल्या पाच दिवसांत (२२ ते २६ जानेवारी २०२५) या काळात विशेष मोहीम आखून राज्यात २१८० चालकांवर नियमांची उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली. उत्तर गोव्यात १,००१ प्रकरणे नोंदली गेली तर दक्षिण गोव्यात १,१७९ प्रकरणे नोंदली गेली. या कारवाईपैकी विनाहेल्मेट ७०८ जणांना दंड ठोठावण्यात आला. फोंडा, मडगाव, पणजी व म्हापसा या प्रमुख शहरांत हेल्मेट न वापरणाऱ्यांचे प्रमाण पुन्हा वाढले आहे.

वाहतूक विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मद्यधूंद वाहन चालवण्यापासून ते हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे, अतिवेगाने गाडी चालवणे यासारख्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे त्यामुळे या विभागाकडून अधुनमधून विशेष मोहीम दिवसा व रात्री आखून कारवाई करण्यात येत आहे. या काळात मोटर वाहन कायद्याच्या कलम १८५ अंतर्गत मद्यधुंद वाहन चालवण्याचे एकूण १०३ गुन्हे नोंदवण्यात आले, ज्यामध्ये उत्तर गोव्यात ५८ तर दक्षिण गोव्यात ४५ गुन्हे दाखल झाले.

पाच दिवसांच्या कालावधीत, ७०८ दुचाकीस्वारांना हेल्मेट न घातल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला, ज्यामध्ये उत्तर गोव्यात ४१३ व दक्षिणेत २९५ गुन्हे नोंद झाले आहेत. अतिवेगाने वाहन चालवणे प्रमाण पोलिसांकडून कारवाई होऊन त्याकडे दुर्लक्ष केले जात आह. निश्‍चित करण्यात आलेल्या वेगावर नियंत्रण ठेवता वेगाने वाहन चालवणे सुरूच आहे.त्यामुळे याकडे पोलिसांनी लक्ष दिले आहे.

धोकादायक पार्किंगचे ७९२ गुन्हे

गेल्या पाच दिवसांत धोकादायक पार्किंगबद्दल ७९२ गुन्हे दाखल झाले, त्यापैकी ४५० गुन्हे दक्षिण गोव्यात आणि ३४२ गुन्हे उत्तर गोव्यात पकडले गेले. तालुक्यांमध्ये, फोंडा आणि मडगाव वाहतूक उल्लंघनाचे हॉटस्पॉट म्हणून उदयास आले, या कालावधीत प्रत्येकी २७७ गुन्हे नोंदले गेले. त्यानंतर पणजीत २२२ प्रकरणे नोंदली गेली, तर वास्कोत २१९ आणि अंजुना येथे २०२ प्रकरणे नोंद आहेत. काणकोणात १५२ आणि दाबोळी (विमानतळ पोलिस) येथे सर्वात कमी २६ गुन्हे नोंदले गेले. केपे येथे ४५, मोपा विमानतळ पोलिसांनी ४६, पर्वरी येथे ५२ उल्लंघने नोंदली गेली तर कोलवा, कळंगुट आणि डिचोली येथे अनुक्रमे ६९, ८८ आणि ९० गुन्हे नोंदले गेले.

गेल्या दोन वर्षांत अपघात आणि मृत्यूंमध्ये वाढ होत असताना, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मद्यधूंद वाहन चालवणे, अतिवेगाने वाहन चालवणे आणि हेल्मेट न घालता वाहन चालवणे हे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढण्याचे कारण असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी नियम उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.
प्रबोध शिरवईकर, पोलिस अधीक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT