Goa Traffic Violations: वाहतूक विभागाचा दणका! 15627 जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई; 347 मद्यपींच्या परवाना रद्दची मागणी

Traffic violations in Goa: नववर्षाच्या सुरुवातीपासून वाहतूक पोलिसांनी रात्रीच्यावेळी मद्य प्राशन करून वाहन चालकांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे.
Goa Traffic Police
Traffic PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: यावर्षी राज्यात गेल्या २० दिवसांच्या कालावधीत मोटार वाहन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिस विभागाने १५,६२७ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहेत. यामध्ये हेल्मेट न वापरलेल्या २६७५ चालकांचा समावेश आहे. राज्यात १३२ अपघातांची नोंद झाली असून ११ भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३१ जण गंभीर जखमी झाले आहेत.

पणजी शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे तसेच जादा ३० पोलिस कर्मचारी विभागाला देण्यात आले आहेत अशी माहिती वाहतूक पोलिस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी दिली.

नववर्षाच्या सुरुवातीपासून वाहतूक पोलिसांनी रात्रीच्यावेळी मद्य प्राशन करून वाहन चालकांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. रात्रीच्यावेळी अचानक नाकाबंदी करून ही तपासणी केली जात आहे.

यावर्षी २० जानेवारीपर्यंत मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ३४७ जणांविरुद्ध कारवाई करून त्यांचा चालक परवाना रद्द करण्यासाठी वाहतूक खात्याकडे शिफारस करण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त भरधाववेगाने वाहन चालविल्याने ९५०, वाहन चालविताना मोबाईलवर बोलताना ३७२ जणांविरुद्ध तसेच धोकादायक पार्किंगप्रकरणी २८९३ जणांविरुद्ध, ‘नो एन्ट्री’ क्षेत्रात वाहन घेऊन आलेल्या २०१० जणांविरुद्ध, ‘नो पार्किंग’ क्षेत्रात वाहन पार्क केलेल्या ९६० जणांविरुद्ध, अनधिकृत पार्किंगप्रकरणी ५५४ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. रस्ता अपघात रोखण्यासाठी वेळोवेळी धडक मोहीम राबवण्यात येत असल्याचे अधीक्षक शिरवईकर यांनी सांगितले.

Goa Traffic Police
Goa Traffic Rule: 'ड्रिंक अँड ड्राईव्ह' केल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द; वर्षभरात 5,438 चालकांना तालांव

दरम्यान, पणजी शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस विभागाला जादा ३० पोलिस कर्मचारी देण्यात आले आहेत व ते ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत तेथील जंक्शनवर तैनात करण्यात आले आहेत.

शहरातील रस्ते खोदकाम केल्यामुळे वाहन चालकांना समस्यांना सामोरे जावे लागत असले तरी नो एन्ट्री किंवा अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांना कारवाई करावी लागते त्याला पर्याय नाही.

Goa Traffic Police
Goa Police: गोव्याची सेक्युरिटी टाईट!! ओळख पडताळणी करण्यासाठी पोलीस तयार करतायत अनोखं ॲप

वाहतूक कोंडी

खोदकामामुळे नो एन्ट्रीमध्ये प्रवेश करणे नियमाचे उल्लंघन होत आहे. काही ठिकाणी डबल पार्किंग करण्याचे प्रकारही समोर येत आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com