Goa Shigmotsav 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmotsav 2025: पणजीत शनिवारी शिमगोत्सव मिरवणूक; वाहतूक मार्गात बदल, दुपारनंतर 'हा' मार्ग राहणार बंद

Panaji Traffic Diversion: पणजीमध्ये २२ रोजी डी. बी. बांदोडकर मार्गावरून होणाऱ्या पणजी शिमगोत्सव मिरवणुकीवेळी पणजी शहरात वाहतुकीसाठी मार्गबदल करण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पणजीमध्ये २२ रोजी डी. बी. बांदोडकर मार्गावरून होणाऱ्या पणजी शिमगोत्सव मिरवणुकीवेळी पणजी शहरात वाहतुकीसाठी मार्गबदल करण्यात आला आहे. या मिरवणुकीवेळी दुपारी २ वाजल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत मांडवी नदीच्या बाजूने असलेला बांदोडकर मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

त्यामुळे या मार्गावरील वाहतूक इतर रस्त्यांवरून वळवण्यात येणार आहे.या शिमगोत्सव मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी येणाऱ्या पथकांनी दिवजा सर्कल येथील मांडवी पुलाखालून सांता मोनिका जेटी येथून ज्या ठिकाणापासून (जुने सचिवालय) मिरवणुकीला सुरुवात होणार आहे, तेथे येणे आवश्‍यक आहे.

केटीसी सर्कलकडून दिवजा सर्कलकडे पथकांना येण्यास बंदी असेल. ही पथके मेरशी सर्कलकडे बायपास रस्त्यांने वळवण्यात येतील व रायबंदर रस्त्यावरून सांता मोनिक जेटीकडे पाठवण्यात येतील.

पणजी शहरात येणारी वाहतूक नव्या पाटो पुलावरून नेहमीप्रमाणे पुढे आल्यानंतर जुन्या सचिवालयाजवळील बांदोडकर पुतळ्याकडून वळवून ती एम. जी. मार्ग व चर्च चौकाकडे पुढे जाईल. मिरामार येथून कला अकादमीकडे येणारी वाहतूक कांपाल येथील गणेश घुमटीकडून वळवून ती १८ जून रस्ता, कोर्तीन रस्त्यावरून ती मळा - भाटले रस्त्यावरून पुढे जाणार आहे.

अवजड वाहनांना सकाळी ७ पासून ते रात्री ९ वाजेपर्यंत प्रवेश करण्यास मनाई असेल. पर्यटन बसेस तसेच व्यावसायिक वाहने दुपारी २ वाजल्यानंतर मिरामार सर्कलकडूनच आतील रस्त्याने वळविली जातील, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

पार्किंगची सोय

उत्तर गोव्यातून शिमगोत्सव मिरवणुकीसाठी येणाऱ्या वाहनांसाठी ईडीसी प्लाझा/एमएलसीपी/ केटीसी बसस्टँड येथे पार्किंगची सोय करण्यात आली आहे. दक्षिण गोव्यातून येणाऱ्या वाहनांसाठी गोमेकॉ - गोवा विद्यापीठ - एनआयओ सर्कल - मिरामार येथे आल्यानंतर कांपाल परेड मैदानावर पार्किंगची सोय केली आहे.

जोझ फालकांव रस्ता, जुआंव क्रास्टो रस्ता, मॅच कार्नर ते कासा इंटरनॅशनल (एम.जी. रोड), काकुलो बेट ते सांतिनेझ जंक्शन तसेच चर्च चौक ते कोर्तीन फूट ब्रिज येथील रस्ता ‘नो पार्किंग’ झोन म्हणून उद्याच्या एका दिवसासाठी घोषित करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT