Shigmotsav in goa Dainik Gomantak
गोवा

शेकडो वर्षांपासून चोपडेत शिगमोत्सव साजरा करण्याची परंपरा

परंपरा कायम: शंभर वर्षांपासून शिवोली, ओशेलबाग, काससूव रोमटामेळाचे आयोजन

दैनिक गोमन्तक

मोरजी: एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात पारंपरिक रोमटामेळ अर्थात शिगमोत्सव साजरा करण्याची शेकडो वर्षाची परंपरा चोपडे गावाने आजही राखलेली आहे. चोपडे गावातर्फे शेकडो वर्षांपासून ही परंपरा जतन केली जाते. शिगमोत्सवाची चौथ्या दिवशी, पाचव्या दिवशी आणि सहाव्या दिवशी पेडणे तालुक्यातील चोपडेतर्फे बार्देशातील गुडे शिवोली, ओशेलबाग, कायसूव ठिकाणी शिगमोत्सव साजरा केले जातो. त्याचपद्धतीने यंदाही कार्यक्रम सादर करण्यात आला.

चोपडे गावातील रोमटामेळ गोव्यातील हे आगळेवेगळे असे वैशिष्ट्य आहे. चोपडे गावातून शिगमोत्सवाला प्रारंभ होळीच्या निमित्ताने होत असला, तरी अगोदर तीन दिवस शिगमोत्सवातील मंडळी शिगमोत्सव सादर करणाऱ्या कलांची तीन दिवस तालीम घेतात. चोपडे येथील श्री भूमिका रवळनाथ यांच्या नावाची होळी आणली जाते. रवळनाथ भूमिका मंदिरात विधिवत पूजा केल्यानंतर होळीचे त्या ठिकाणी हवन करतात. यावेळी विविध विधी करून उत्सवाला सुरुवात होते.

होळीच्या चौथ्या दिवशी पाचव्या आणि सहाव्या दिवशी जी पारंपरिक प्रथा आहे. ती प्रथा चोपडेचे रोमटामेळ काससूव-शापोरा नदी पलीकडील बार्देश तालुक्यातील गावे आहेत. तेथे गुडे ओशेलबाग या भागात जाऊन शिगमोत्सव साजरा करतात. सलग तीन दिवस रोमटामेळ त्या गावात फिरत असतो. अगोदर प्रमुख ग्रामदेवतेला त्या ठिकाणी विधिवत पूजन केले जाते. जो मानसन्मान असतो, तो मान सन्मान स्वीकारला जातो. त्यानंतर त्या परिसरातील घराघरांत जाऊन रोमटामेळ जातो. त्या ठिकाणी अनेक नागरिक आणि लोक आपल्या मनातील नवस प्रमुखांकडे कथन करतात आणि देवाकडे मागणी करतात. पुढील वर्षी नवस फेडण्याची प्रथा या ठिकाणी आहे. ही प्रथा आजही त्याच पद्धतीने साजरी केली जाते, अशी माहिती चोपडे देवस्थानचे अध्यक्ष भगीरथ गावकर यांनी सांगितले.

नवस फेडण्याची प्रथा

श्री स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष नीलेश वेर्णेकर म्हणाले, चोपडे गावातील रोमटामेळ मागच्या कित्येक वर्षापासून शिवोलीत येऊन अगोदर प्रमुख देवतांचे दर्शन आणि त्यानंतर जी विधिवत पूजा केली जाते. घराघरात रोमटामेळ जाऊन तेथील लोकांकडून श्रीफळ किंवा इतर ज्या वस्तू शबयच्या निमित्ताने दिल्या जातात, ते स्वीकारल्या जातात. काहीजण आपल्या मनातील नवस यावेळी प्रमुखांकडे व्यक्त करतात. पुढच्या वर्षी ज्यावेळी हे रोमटाळमेळ पुन्हा येतात, त्यावेळी त्यांची जर मनोकामना पूर्ण झाली, तर तो नवस फेडाला जातो, अशी ही प्रथा या भागात आजही चालू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT