Electricity Problem Dainik Gomantak
गोवा

Margao Electricity: जुनाट वीज यंत्रणा बदला, व्यापाऱ्यांची मागणी

Margao Electricity: मडगाव येथील न्‍यू मार्केटमध्‍ये जी आग लागली त्‍यामागचे मुख्‍य कारण येथील काही दुकानांचा बेकायदा विस्‍तार आणि जुनाट वीजयंत्रणा हेच असून जुनाट वीज यंत्रणा मडगाव पालिकेने ताबडतोब बदलावी, अशी मागणी व्‍यापाऱ्यांनी केली आहे.

दैनिक गोमन्तक

Margao Electricity: मडगाव येथील न्‍यू मार्केटमध्‍ये जी आग लागली त्‍यामागचे मुख्‍य कारण येथील काही दुकानांचा बेकायदा विस्‍तार आणि जुनाट वीजयंत्रणा हेच असून जुनाट वीज यंत्रणा मडगाव पालिकेने ताबडतोब बदलावी, अशी मागणी व्‍यापाऱ्यांनी केली आहे.

काही दुकानदारांनी आपल्‍या दुकानांचा बेकायदा विस्‍तार करून त्‍यात एसीसारख्‍या यंत्रणा बसविल्‍या आहेत. त्‍यामुळे वीज यंत्रणेवर अतिभार पडून शॉर्टसर्किट होते.

या आगीमागेही हेच कारण असण्‍याची शक्‍यता आहे. वीजेचा हा अतिरिक्‍त भार जुनाट यंत्रणा पेलू शकत नाही.

या मार्केटातील वायरिंग जुने झाले असून ते पालिकेने त्‍वरित बदलावी अशी मागणी आम्‍ही कित्‍येक वेळा पालिकेकडे केली मात्र त्‍याकडे वारंवार दुर्लक्षच करण्‍यात आले.

आता तरी पालिकेने आमच्‍या मागणीकडे गंभीरतेने लक्ष द्यावे अशी मागणी न्‍यू मार्केट व्‍यापारी संघटनेचे अध्‍यक्ष विनोद शिरोडकर यांनी केली.

या मार्केट परिसरात अनेक नवीन इमारती तयार झाल्‍या आहेत, त्‍यांनी पार्किंगसाठी कुठलीही व्‍यवस्‍था केलेली नाही. त्‍यामुळे रस्‍त्‍यावर वाहने पार्क करतात.

अशा दुर्घटनेच्‍या वेळी त्‍याचा फटका न्‍यू मार्केटातील व्‍यापाऱ्यांना बसतो असे ते म्‍हणाले.

मडगावातील मार्केटात आग लागली तर त्‍वरित पाण्‍याची सोय व्‍हावी यासाठी यापूर्वी मार्केट परिसरात पाण्‍याची टाकी उभारण्‍याचे ठरले होते.

मात्र पुढे त्‍यासंदर्भात काहीच झालेले नाही. ही टाकी बसविण्‍यासाठी आतापर्यंत पाच वेगवेगळ्‍या जागा निश्‍चित केल्‍या पण अजूनही ही टाकी उभी होत नाही, ही अत्‍यंत दुर्दैवी बाब आहे असे शिरोडकर म्‍हणाले.

आग लागल्‍यावरच जाग येणार का?

मडगाव मार्केटमध्ये आग लागते, त्‍यावेळीच मडगावचे प्रशासन सतर्क होते. मात्र त्‍यानंतर त्‍यात पुन्‍हा शिथिलता येते. आग लागल्‍यावरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल शॅडो कौन्‍सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्‍हो यांनी केला.

मडगावच्‍या काही व्यापाऱ्यांनी राजकीय आशीर्वादाने आपल्‍याला हवा तसा बेकायदेशीर विस्‍तार केला आहे, त्‍याकडे पालिका आणि अन्‍य अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्‍यामुळेच वारंवार अशा दुर्घटना घडत आहेत, असा आरोप कुतिन्‍हो यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT