Tourists have to pay hundred rupees to enter Goa  Dainik Gomantak
गोवा

नेत्रावळीत शुल्‍काच्‍या नावाखाली पर्यटकांची लूट!

प्रवेशासाठी मोजावे लागतात शंभर रुपये: गोवा सरकारने लक्ष न घातल्‍यास पर्यटन, रोजगारावरही परिणाम

दैनिक गोमन्तक

सांगे: पावसाळा ओसरत चालल्याने नेत्रावळीतील पर्यटनाला बहर येणार आहे. पण, नेत्रावळीत भेट देणाऱ्या पर्यटकांकडून अभयारण्य प्रवेशद्वारावर प्रतिव्‍यक्ती शंभर रुपये आकारले जात आहेत. त्‍यामुळे पर्यटक व ग्रामस्‍थांकडून नाराजी व्‍यक्त केली जात आहे. सरकारच्‍या या निर्णयाचा फटका पर्यटन अवलंबितांवर होणार आहे. सरकारने याप्रकरणी लक्ष घालण्‍याची मागणी ग्रामस्‍थांसह पर्यटकही करू लागले आहेत.

दिलासा द्यावा

गेल्या दीड दोन वर्षात कोविड महामारीमुळे रोजगार बुडाला होता. आता हळूहळू पर्यटन हंगाम सुरू होणार असल्याने गेल्या दोन वर्षांची परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातील पर्यटन स्थळावर जाणाऱ्या पर्यटकाकडून आकारले जाणारे शुल्क कपात करून नेत्रावळीतील नागरिकांना पर्यटन व्यवसाय चालविण्यासाठी सरकारने सहकार्य करण्याची जोरदार मागणी होऊ लागली आहे.

प्रवेशासाठी मोजावे लागतात शंभर रुपये

पर्यटकांत नाराजी

नेत्रावळीत म्हणावा तसा पर्यटन हंगाम सुरू झाला नाही. तरीही शुल्कासंदर्भात पर्यटकांकडून सुरवातीपासून नाराजी व्‍यक्त केली जात आहे. नेत्रावळीत आल्यास नेत्रसुखद फेसाळते धबधबे, बुडबुड तळी, मंदिरे, जवळून पाहता येणारा हिरवागार निसर्ग, हिव्हाळ्यात होणारी स्ट्रॉबेरी अशा अनेक पर्यटन स्थळांचा आस्वाद घेता येऊ शकतो. पण, यंदा पर्यटकांच्या खिशाला परवडणार नाही एवढे प्रवेश शुल्क आकारले जाऊ लागल्याने नाराजीचा सूर निर्माण होत आहे. त्‍याचा परिणाम व्यापारी वृद्धीवर होत आहे.

...तर बेरोजगारी अटळ?

नेत्रावळीत अनेक पर्यटन स्थळे नावारूपास आल्याने अन्य कोणतेही रोजगाराचे साधन नसलेल्या बेरोजगारांचा प्रश्‍न तात्‍पुरता सुटला होता. मात्र, अभयारण्य फाटकावर आकारण्यात येणाऱ्या प्रवेश शुल्कामुळे हा व्यवसाय धोक्यात येण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. अभयारण्य क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या वाहनाकडून दोनशे रुपये, तर प्रत्‍येक पर्यटक शंभर रुपये महसूल गोळा केला जात आहे. पर्यटकांच्या म्हणण्यानुसार अभयारण्य क्षेत्रात कोणतीही सुविधा नसताना इतक्या प्रमाणात शुल्क आकारणे परवडणारे नसल्याने अनेक पर्यटक फटका पर्यंत जाऊन पर्यटनाचा आस्वाद न घेता आल्या पावली माघारी फिरत आहे. चारचाकी वाहनात पाचजण आल्यास पाचशे रुपये व वाहनासाठी दोनशे रुपये मोजावे लागतात. सर्वसामान्य पर्यटकांना आकारण्यात येणारे शुल्क खूपच वाटत असल्यामुळे पर्यटकांना नाउमेद व्हावे लागत आहे.

पाचपट शुल्‍कवसुली

गेल्‍या वर्षी प्रत्‍येक पर्यटकाकडून शुल्‍कापोटी वीस रुपये आकारण्‍यात येत होते. आता शंभर रुपये आकारले जात आहे. जानेवारी 2021 पासून वाढीव दर लागू केले आहेत. या क्षेत्रात धबधबे वगळता अन्य सुविधा नसल्याने अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांना शुल्क कपात होणे आवश्यक आहे.

"अभयारण्य क्षेत्रात जाणाऱ्या पर्यटकांची शुल्क आकारले जाते ते गोवा सरकारच्या परिपत्रकानुसार. गोव्यातील सर्व अभयारण्यांना हा वाढीव शुल्क दर लागू होतो. त्‍यानुसार आकारणी केली जात आहे."

- बिपीन फळदेसाई, वन अधिकारी (नेत्रावळी विभाग)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

SCROLL FOR NEXT