Goa: पर्यटन व्यावसायिकांना परवानगी देण्यासाठी काणकोण पालिकेची एक खिडकी योजना

यापूर्वी पर्यटन व्यावसायिक अर्जदाराना पालिकेच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्याकडे परवाना मिळविण्यासाठी हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारी होत्या.त्या तक्रारीची दखल घेत ही प्रक्रिया सुटसुटीत व पारदर्शक करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पर्यटन व्यावसायिकांना परवानगी देण्यासाठी काणकोण पालिकेची एक खिडकी योजना.
पर्यटन व्यावसायिकांना परवानगी देण्यासाठी काणकोण पालिकेची एक खिडकी योजना.Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa: काणकोण पालिकेने (Canacona Municipality) काणकोण मधील पर्यटन व्यावसायिकांना (tourism professionals) परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना राबविण्याचे धोरण (one-stop shop scheme) अवलंबिले असल्याचे नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांनी सांगितले.यापूर्वी पर्यटन व्यावसायिक अर्जदाराना पालिकेच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्याकडे परवाना मिळविण्यासाठी हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारी होत्या.त्या तक्रारीची दखल घेत ही प्रक्रिया सुटसुटीत व पारदर्शक करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पर्यटन व्यावसायिकांना परवानगी देण्यासाठी काणकोण पालिकेची एक खिडकी योजना.
Goa: भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचे आज गोव्यात आगमन झाले

परवान्यासाठी अर्ज करताना अर्जदाराने सेक्युरिटी डिपॉझिटसह पर्यटन कुटिरे व रेस्टॉरंट शुल्काचा भरणा पालिका तिजोरीत करणे गरजेचे आहे.त्यानंतर पालिका अभियंता व संबंधीत पालिका कर्मचारी प्रत्यक्ष पर्यटनस्थळी जाऊन पर्यटन कुटिरांची संख्या व रेस्टॉरंट यांची पहाणी करणार आहेत त्यानंतर शुल्क भरलेल्यापेक्षा कुटिरे व रेस्टॉरंट यांची संख्या जास्त असल्यास उर्वरित ज्यादा कुटिरांचे व रेस्टॉरंटचे शुल्क भरून घेऊन परवानगी देण्यात येणार आहे त्यामुळे पालिकेचा महसूल बुडणार नाही याची तजवीज करण्यात आली आहे.प्रत्येक कुटिरामागे प्रत्येकी पांच हजार रूपये व प्रत्येक रेस्टॉरंट मागे दहा हजार रूपये परवाना शुल्क आहे.त्याशिवाय कचरा संकलन शुल्क म्हणून प्रत्येक परवान्यामागे पंधरा हजार रूपये शुल्क निर्धारित करण्यात आले आहे.सद्या करोना महामारीचा फटका पर्यटन व्यवसायाला बसला असल्यामुळे शुल्कात वाढ करण्यात आली नसल्याचे नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांनी सांगितले.

पर्यटन व्यावसायिकांना परवानगी देण्यासाठी काणकोण पालिकेची एक खिडकी योजना.
गोव्यात आज या ठिकाणी वीजपुरवठा खंडित

पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्याची गरज

काणकोण पालिका क्षेत्राचा विकास साधण्यासाठी पूर्ण वेळ मुख्याधिकाऱ्याची पालिकेला गरज आहे.सद्या मुख्याधिकारी पदाचा ताबा असलेले उपजिल्हाधिकारी आठवड्यातून फक्त दोनच दिवस पालिका कामकाज हाताळत असतात.त्यादिवसांत त्यांना तातडीची बैठक किंवा प्रशिक्षण निघाल्यास त्या दिवसातही ते पालिकेत उपलब्ध होऊ शकत नाहीत यासाठी पूर्ण वेळ मुख्याधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली होती मात्र गेले तीन महिने ही मागणी मान्य करण्यात आली नाही.पालिका मुख्याधिकाऱ्याचे वेतन देण्यास सक्षम असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.पालिकेकडे चौदा व पंधरा वित्तीय अनुदान तसेच पालिका निधीचे७ ते ८ कोटी रूपये पडून आहेत.या निधीतून विकास कामे करण्यासाठी पूर्ण वेळ मुख्याधिकाऱ्याची गरज असल्याचे नगरसेवक रमाकांत नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com