Goa Election: "आमदार का फुटले याचा काँग्रेसने विचार करावा"

आम आदमी पक्ष पोस्टरबाजीत व्यस्त, राज्य चालवण्यासाठी आचार, विचार व नीती लागते.
BJP will come to power again in Goa: Devendra Fadnavis
BJP will come to power again in Goa: Devendra FadnavisDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आम आदमी पक्ष (AAP) हा केवळ पोस्टरबाजीत व्यस्त आहे. राज्य चालवण्यासाठी आचार, विचार व नीती लागते. अराजकतेने केवळ अस्तित्व दाखवता येते. राज्य चालवता येत नाही, असा टोला भाजपचे (BJP) निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल पत्रकार परिषदेत लगावला.

ते म्हणाले, कॉंग्रेसचे 10 आमदार का घ्यावे लागले याचा विचार आम्ही करण्यापेक्षा आपले आमदार नेतृत्वावरील विश्वास गमावून दुसऱ्या पक्षात का गेले याचा विचार कॉंग्रेसने केला पाहिजे.

BJP will come to power again in Goa: Devendra Fadnavis
Goa: भाजप सरकार आयुष डॉक्टरांचे मानधन वाढवण्यात अपयशी; गोवा फॉरवर्ड

कॉंग्रेसमध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर नेतृत्वाची वानवा आहे. त्याचमुळे बहुतांशवेळा त्यांचे नेते पूर्णवेळ अध्यक्षांची मागणी करतात आणि पक्षाचे अध्यक्ष पूर्णवेळ काम करत नाहीत म्हणजेच अर्धवेळ काम करतात याची कबुली देतात. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांत, रक्तात,डोक्यात नेहमी देशाचे हित असते.

पर्रीकरांविना निवडणूक

गोव्याचे शिर्षस्थनेते स्व. मनोहर पर्रीकर आज आमच्यात नाहीत. ते नसतानाची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यांच्या अनुपस्थितीत ही निवडणूक लढावी लागणार आहे. मनोहर भाईंनंतर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी समर्थपणे पेललेले डॉ. प्रमोद सावंत यानी अडीच वर्षात चांगले काम करून दाखवले आहे. कोविड व्यवस्थापनातून त्यांनी शंभर टक्के लसीकरण करून दाखवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तासभर राज्यातील कामगिरीचा आढावा घेताना सरकारच्या कामगिरीची स्तुती केली आहे.

BJP will come to power again in Goa: Devendra Fadnavis
Goa Assembly Election: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोव्यात राजकीय घडामोडींना वेग

पक्षात बंडाळी होणार नाही

फडणवीस म्हणाले, या साऱ्याच्या बळावर भाजपचे नेते, पदाधिकारी एकजुटीने निवडणुकीला सामोरे जातील. पक्षात बंडाळी होणार नाही. राजकारणात मतेमतांतरे म्हणजे बंडाळी नव्हे. नवा चेहरा असलेल्या आधुनिक गोव्याची मुहूर्तमेढ स्व. मनोहर पर्रीकर यांनी रोवली तर आताचे सरकार ती कामे पूर्णत्वास नेत आहे. यामुळे पर्यटन व रोजगारनिर्मिती याचा फायदा जनतेला होणार आह. हे सारे साकार करण्यासाठी आम्ही सारे एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com