New Year 2024 Dainik Gomantak
गोवा

New Year 2024: तोच सूर्य, तेच जग, उमेद नवी

New Year 2024: किनाऱ्यांवर पर्यटकांचा महासागर : ‘2024 ’चे जल्लोषात स्वागत; मद्यपी होते रडारवर

दैनिक गोमन्तक

New Year 2024: रूपेरी किनाऱ्यांकडे फेसाळत येणाऱ्या लाटा आणि त्यांची गाज... अस्तंगत होणारा सूर्य... मावळतीला क्षितिजावर पसरलेली लाली... आणि पर्यटकांचा उदंड उत्साह... अशा जोशपूर्ण वातावरणात आज (रविवारी) ‘2023’ वर्षाला निरोप देऊन नव्या 2024वर्षाचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले.

यंदाही किनारी भागांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झालेली दिसून आली. राज्यातील रेस्टॉरंट, हॉटेल्स हाऊसफुल्ल झाली असून पर्यटकांनी अखेरच्या क्षणी मिळेल तेथे आसरा घेत गोव्यात नव्या वर्षाचे स्वागत केले. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्यधुंद होऊन वाहने चालवणाऱ्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरील कारवाईसाठी मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले होते. मद्यतपासणी करण्यासाठी सुमारे ८० अल्कोमीटर्स पोलिसांना देण्यात आले होते.

1 रविवारी किनाऱ्यांवर गर्दी असली तरी दरवर्षीच्‍या तुलनेत ही संख्‍या कमी होती. शॅक तसेच हॉटेल चालकांनी समुद्र किनाऱ्यांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

2 महाराष्‍ट्र, कर्नाटक, गुजरातहून मोठ्या संख्‍येने देशी पर्यटक राज्यात दाखल झाले होते. त्‍यामुळे व्‍यावसायिक दृष्‍टीकोनातून मोठ्या प्रमाणात उलाढाल वाढली.

मद्यधुंद चालकांमुळे होणाऱ्या रस्ते अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. ही मोहीम नाताळपासून सुरू आहे. सुमारे ८० नवीन अल्कोमीटर्स वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत.
- अक्षत कौशल, वाहतूक पोलिस अधीक्षक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

Viral Video: रिल्ससाठी कायपण! साडी नेसून पठ्ठ्याने लावले ठुमके, मेट्रोमधील भन्नाट डान्स व्हायरल; नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत घेतली शाळा

IND vs WI: स्वातंत्र्य दिनी किंग कोहलीचा धमाका! वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकलं दमदार शतक; टीम इंडियासाठी '15 ऑगस्ट' लय खास

Cricketer Death: क्रिडाविश्वात खळबळ, 138 विकेट्स आणि 2000+ धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूचं निधन

SCROLL FOR NEXT