Theft News In Goa
Theft News In GoaDainik Gomantak

Theft News In Goa: महागड्या मोबाईलवर चोरट्यांचा डल्ला

Theft News In Goa: 29 मोबाईल जप्त : सनबर्नसह गर्दीच्या ठिकाणी पर्यटकांना फटका, सात जणांना अटक

Theft News In Goa: गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचे महागडे फोन चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला हणजूण पोलिसांनी आज महाराष्ट्रामधील सात जणांना अटक केली. या संशयितांकडून पोलिसांनी आत्तापर्यंत 29 महागडे मोबाईल संच हस्तगत केले, ज्यांची किंमत 25 लाख रुपये आहे.

Theft News In Goa
Goa Politics: केंद्रात शिष्‍टमंडळ नेले नाही, तर सभापतींच्‍या घरावर मोर्चा

संशयित आरोपींमध्ये उबेदुल्ला खान (४३), ओवेझ पडाया (३१), सोहेल मेमन (३२), अब्दुल रहमान (४४), सद्दाम अली (३०), मोहम्मज झीशान (२१) व सोहेल शेख (२२) यांचा समावेश आहे. उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी शनिवारी हणजूण पोलिस स्थानकात आयोजित पत्रकार परिषदेत वरील आंतरराज्य टोळीवर केलेल्या कारवाईविषयी माहिती दिली.

अधिकतर सनबर्न महोत्सव तसेच इतर ठिकाणांहून मिळून ५० पेक्षा जास्त महागडे फोन लंपास होण्याच्या तक्रारी पोलिस स्थानकात दाखल झाल्या आहेत. त्यानुसार, पोलिसांनी या टोळीचा पदार्फाश केला.

Theft News In Goa
Traffic Problem: मोरजी, वागातोर, पर्वरीमध्ये वाहतूक कोंडीची समस्या

पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रशल देसाई यांनी नेतृत्व करीत या टोळीचा पदार्फाश केला. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी उपनिरीक्षक आशिष पोरोब, कॉन्स्टेबल सत्येंद्र नास्नोडकर, महेंद्र मांद्रकेर, सुदेश केरकर, शांबा शेटगांवकर, रुपेश आसगांवकर, लक्ष्मण सावळ देसाई, आदर्श नागवेकर, मयूर घाडी, अभिषेक कासार, अनिकेत पेडणेकर, किशन बुगडे, दिपेश चोडणकर, अमीर फडके व शाणून राऊत यांनी सहभाग घेतला.

गेल्या वर्षी सनबर्न महोत्सवस्थळी पर्यटकांचे मोबाईल फोन लंपास होण्याचे प्रकार घडले होते. तेव्हा २०० पेक्षा अधिक फोन चोरीला गेले होते. मात्र यंदा पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेतल्याने तशी ही संख्या तुलनेने कमीच आहे. गर्दीचे ठिकाणी तथा सनबर्न महोत्सवस्थळी पर्यटकांना हेरणे या टोळीचे प्रमुख लक्ष्य होते.

- निधीन वाल्सन, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com