Tourist Season in Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोव्यात रशियन पर्यटकांचे आगमन; मात्र पर्यटकांना अनुकूल सेवा आजही उपलब्ध नाहीत!!

गोमन्तक डिजिटल टीम

Tourism Season in Goa

गोवा: रशियामधून दोन चार्टर विमानं आज गोव्यात उतरली आणि यामुळेच राज्यात पर्यटनाचा हंगाम सुरु झाला असं म्हणता येतं. गोवा हा देशातील अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे.

ट्रॅव्हल अँड टूरिझम असोसिएशन ऑफ गोवा (TTAG) चे अध्यक्ष जॅक सुखिजा यांनी यापूर्वीच पर्यटन क्षेत्रातील काही महत्वाच्या पैलूंमध्ये बदल घडवण्याची गरज असल्याचे सूचित केले होते.

अतिवृष्टीमुळे राज्यात झालेली रस्त्यांची दुर्व्यवस्था आणि कचऱ्याचे व्यवस्थापन असे काही मुद्दे त्यांनी अधोरेखित केले होते. सोबतच पार्किंगच्या समस्येकडे लक्ष वेधत त्यांनी समुद्रकिनारी पर्यटकांच्या होणाऱ्या गैरसोयीकडे सरकारने लक्ष घालावे अशी विनंती केली होती.

राज्यात टॅक्सी चालक आणि कॅब चालक यांच्यामध्ये देखील वाद सुरूच आहेत. ट्रॅव्हल अँड टूरिझम असोसिएशन ऑफ गोवा (TTAG) चे माजी अध्यक्ष निलेश शहा यांनी टॅक्सी चालक आणि कॅब चालक यांच्यामध्ये सुरु असलेल्या वादाला अनुसरून एक महत्वाचे वक्तव्य केले, त्यांच्या मते राज्यात वाहतुकीसाठी ॲप्स तर नक्कीच आहेत मात्र पर्यटकांना व्यवस्थित सेवा पुरवणाऱ्या प्रणालीची कमतरता कायम जाणवते.

राज्यात असलेले इतर अडथळे पर्यटनाला पूरक नाहीत. गोव्यातील रस्त्यांची बिकट स्थिती, वाहतूक सेवा, पार्किंगची गैरसोय असे अनेक प्रश्न आजही उपस्थित आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: अमित पाटकर यांच्याकडून TCP मंत्री आणि इतरांविरुद्ध तक्रार दाखल!!

Goa Diary: एकेकाळी फेणीसाठी प्रसिद्ध असलेलं हे गाव आज बनलंय पर्यटकांचं केंद्र, कोरोनानंतर हा बदल कसा घडला?

गोव्यातील रस्ता सुरक्षा सप्ताह! 'उपक्रम' की जबाबदारी 'लोकांवर' ढकलण्याचा उद्योग

Calangute Beach: यापुढे 'डान्सबारना' थारा नाही; शांतता राखण्यासाठी 'कळंगुट'वासीयांची एकजूट

Goa History: गावड्यांच्या शुद्धीकरणाचे सत्य आणि आदिम सांस्कृतिक जीवनशैली

SCROLL FOR NEXT