World Tourism Day Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism News: पर्यटनासमोरचे अडथळे दूर करा; व्यावसायिकांची मागणी!

Goa News: क्षेत्रातील विविध संस्थांच्या वतीने काल राज्यभर आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ दिन साजरा करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

Panjim: नवा पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी पर्यटन क्षेत्रासमोरील विविध अडथळे दूर करावेत, अशी मागणी आज पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांनी केली आहे. राज्य सरकार व या क्षेत्रातील विविध संस्थांच्या वतीने काल राज्यभर आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ दिन साजरा करण्यात आला.

दोना पावला येथील हॉटेलमध्ये झालेल्या या विशेष कार्यक्रमात ही व्हिसा बंदी प्रकरण, किनारे आणि पर्यटन स्थळांची स्वच्छता, राज्यभरातली पर्यटन स्थळांमधली कनेक्टिव्हिटी सुधारणे याबरोबरच व्यावसायिकांना सुलभ व्यवसाय करता यावा, यासाठी विविध नियमावलींचे सुलभीकरण व्हावे, अशा मागण्या व्यावसायिकांनी केले आहेत.

यावेळी गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार गणेश गावकर म्हणाले, गोवा जगभर ‘बीच टुरिझम’ साठी प्रसिद्ध आहे, याबरोबरच आता इंटरलँड टुरिझम पर्यटन वाढीस लागले पाहिजे कारण पर्यटकांना ते हवे आहे. कोरोनाच्या संकटानंतरच्या काळातही गोवा हे जगभरातल्या पर्यटकांची पहिली पसंती राहिली आहे.

राज्य सरकारकडून ‘इंटरलँड’ पर्यटनाला प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी व्यावसायिकांनी पुढे आल्यास या व्यवसायाला त्याचा फायदा होईल. गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड, पर्यटन सचिव रवी धवन, गोवा टूर अँड टुरिझम असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शहा , पर्यटन खाते आणि पर्यटन महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

गोव्याला पर्यटन राजधानी बनविण्याचा प्रयत्न

पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून राज्य देशाची पर्यटन राजधानी बनवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यामुळे व्यावसायिकांना सर्व तोपर्यंत सहकार्य केले जाईल असे मुख्यमंत्री डाॅ.प्रमोद सावंत यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

Goa Today's Live News: महिलेच्या गळ्यातील लाखभर रुपयांचे मंगळसूत्र लंपास

Honda IDC: अनेकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी बनलेली सत्तरीतील 'ती औद्योगिक वसाहत पडलीये ओसाड

Chitrasangam 2024: प्रतिभावंतांचा कलाबहर! 'चित्रसंगम'मध्ये 17 चित्रकारांच्या कलाकृती

12th Fail अभिनेत्याकडे नव्हते गोव्यात हॉटेलचे बिल द्यायला पैसे, मुंबईच्या तिकिटासाठी विकला मोबईल; विक्रांतने सांगितला किस्सा

SCROLL FOR NEXT