Babu Ajgaonkar allegations Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: गोवा भाजपला हवेत ‘होय बा’! बाबूंचा घरचा आहेर; तोरसेतून केली कांबळींची उमेदवारी जाहीर

Babu Ajgaonkar: भाजपमध्ये ‘आम्ही करीन ती पूर्व दिशा’ अशा वृत्तीने चालणारे काही लोक आहेत, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे: गोवा भाजपातील काही लोकांना मी नको होतो, म्हणून पेडण्यातून मडगावला पाठवलं. मान डोलवणारी ‘होय बा’ माणसं गोवा भाजपला हवीत. केंद्रीय भाजप चांगली असून त्यांच्याबद्दल तक्रार नाही. मी दोन नावे पाठवली होती, त्यातील एकाचीही निवड न करता कोणालाही माहीत नाही, अशाचे नाव तोरसे ‘झेडपी’साठी निवडल्याने आम्ही हा निर्णय घेत आहे, असे सांगून प्रदीप कांबळी यांची उमेदवारी माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी घोषित केली.

वझरी येथे हिरा फार्म येथे गुरूवारी आयोजित सभेत ते बोलत होते. जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशवकर, सीमा खडपे, धारगळचे सरपंच अर्जुन कानोळकर, वारखंड -नागझरच्या सरपंच कविता कांबळी, तुळशीदास गवस, पल्लवी परब, कामीलो फर्नांडीस आदी मान्यवर उपस्थित होते. यांसभेला बाबू आजगावकर यांचे समर्थक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

आजगावकर म्हणाले की, केंद्रातील भाजपाचे सरकार चांगले असून येथे सुरू असलेला मनमानी कारभार केंद्र सरकारलाही कळावा, हा मी उमेदवार निवडण्यामागील उद्देश असून त्याला मतदार मोठ्या मताधिक्याने निवडून देतील, याची मला खात्री आहे.

मोपा विमानतळ व आयुष इस्पितळासाठी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात जमीन देऊन योगदान दिले आहे या आस्थापनात स्थानिकांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा होती पण याच काळात मला पेडण्यातून पद्धतशीररित्या हटवून मडगावला नेले. या ठिकाणी उमेदवारी दिलेल्याने प्रश्‍न न सोडवता मतदार संघाला पाच वर्षे मागे नेले.

माजी जि.पं. सदस्य सीमा खडपे म्हणाल्या की, वैयक्तिक कारणाने मी ही निवडणूक लढवू शकत नाही. तुळशीदास गावस म्हणाले की, प्रवीण आर्लेकर यांनी अपेक्षा भंग केला आहे. कुलदीप कामत यांनी आभार मानले.

पर्रीकर होते वचनाला जागणारे!

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हेही वचनाला जागणारे होते. मला वचन दिल्याप्रमाणे त्यांनी मृत्यूशयेवर असतानाही माझ्या पेडणे मतदारसंघातील अनेकांना रोजगार दिला. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेही चांगले प्रशासन सांभाळणारे आहेत. पण भाजपमध्ये ‘आम्ही करीन ती पूर्व दिशा’ अशा वृत्तीने चालणारे काही लोक आहेत, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karapur: ..हा अपघाती मृत्यू नाही, घातपाताचा प्रकार! कारापूर प्रकरणी निघणार 'मशाल मोर्चा'; काय आहे प्रकरण Watch Video

Omkar Elephant: कवाथे-केळी फस्त, वाहनांची तोडफोड! 'ओंकार'चा धुमाकूळ; नागरिकांचा आंदोलन छेडण्याचा इशारा Video

Indigo Flight Status: असुविधा के लिए खेद है! इंडिगोची विमानसेवा विस्कळीतच, गोव्यात 11 उड्डाणे रद्द, कंपनीने मागितली माफी

Goa Politics: खरी कुजबुज; मनोजचा ‘सोशल’ संताप

Super Cup 2025: गतविजेत्या FC गोवाची सुपर कपमध्ये मुसंडी! मुंबई सिटीला नमविले, अंतिम फेरीत पडणार ईस्ट बंगालशी गाठ

SCROLL FOR NEXT