Tomato Price Hike Dainik Gomantak
गोवा

Tomato Price Hike : टोमॅटो झाले लालेलाल; 120 रु. किलो तर पालेभाज्याही महागल्या

दैनिक गोमन्तक

राज्यात भाजीपाल्याचे दर अगदी गगनाला भिडले असून वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या आठवड्याभरापासून टोमॅटोच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असून आता घाऊक बाजारात टोमॅटो तब्बल 120 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे.

केवळ टोमॅटोच नव्हे, तर पालेभाज्या, ओली कोथिंबीर, आले, हिरवी मिरची आदींच्या दरातही लक्षणीय वाढ झाली आहे.

शेजारील महाराष्ट्र तसेच कर्नाटकात बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुबलक प्रमाणात पाऊस बरसला नाही. गुजरात, राजस्थानात अतिवृष्टी झाली, बिहार - पश्चिमबंगाल येथे उष्मा अधिक वाढल्याने पिकात घट झाली.

परिणामी देशभर टॉमेटो उत्पादनात घट झाल्याने १०० ते १२० रुपये प्रतिकिलो दराने टोमॅटो विकला जात आहे. ज्यावेळी नवे टोमॅटोचे उत्पादन बाजारात दाखल होईल, तेव्हा दरात घट होईल, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.

गोव्याला बहुतांशी भाजीपुरवठा हा बेळगावमधून होत असतो. बेळगावच्या मार्केटमध्ये टोमॅटोचा तुटवडा असल्याने गोव्याला ८० ते १०० रुपये प्रतिकिलोने टॉमेटो विकत घ्यावा लागत आहे. कोथिंबीर खुल्या बाजारात ५० ते ६० रुपये जुडी या दराने विकली जात आहे.

हिरवी मिरची १२० रुपये किलो, तर आले ३०० रुपये किलो दराने विकले जात आहे. पुढील आठवडाभर भाज्यांचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे. फलोत्पादन महामंडळाच्या दुकानांत दर कमी आहेत, पण तेथेही भाज्यांची कमतरता जाणवत असल्याने बहुतांशी नागरिकांना खुल्या बाजारावरच अवलंबून रहावे लागत आहे.

भाज्यांचे दर (प्रतिकिलो रु.)

भाजी बाजार फलोत्पादन

टोमॅटो ८० ते १२० ७०

कांदे ३० ते ४० २२

बटाटे ४० ते ५० २६

भेंडी ६० ते ८० २४

कोबी ४० २१

हिरवी मिरची १०० ते १२० ७५

कारली ८० ५०८० ते १२० ७०

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT