मुरगाव बंदरातील धक्का नंबर 10 व 11 वरील बॉक्स साईड माल वाहतूक रोखल्याप्रकरणी आमदार संकल्प आमोणकर यांच्यावर कंपनीने पोलिस तक्रार दाखल करावी अशी मागणी वास्को काँग्रेस गटाध्यक्ष ॲड. मॅलविन फर्नांडीस यांनी केली आहे.
वाहतूक अडविल्याने संबंधित कंपनीला 15 कोटींचा आर्थिक फटका बसला असून मुरगावात येणारा 4 लाख टन बॉक्स साईड माल जयगड बंदरात गेल्याची माहिती कुठ्ठाळी काँग्रेस गटाध्यक्ष पिटर डिसोझा यांनी दिली
आमदार वीरेश बोरकर मागील 8 तासाहून अधिक काळ पणजीतील नगर नियोजन खात्याच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन. प्रश्नांची समाधानकारक उत्तर न मिळाल्यास उपसंचालक के. अशोक कुमार यांच्याविरुद्ध विशेषाधिकार प्रस्ताव मांडणार असल्याचे बोरकर यांची माहिती.
कुडतरी चांदर रस्त्यावर ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला असून, यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे.
सांत आंद्रे मतदारसंघातील डोंगरकापणी आणि बेकायदेशीर बांधकाम प्रकल्पांची कागदपत्रे देत नसल्याच्या कारणास्तव आमदार विरेश बोरकारांचे पणजीतील नगर नियोजन खात्याच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन.
अधिकारी भेटायला येत नाहीत तोपर्यंत कार्यालयातून उठणार नसल्याचा आमदार बोरकर यांचा पवित्रा
व्हेल माशाची उलटी (अॅम्बरग्रीस) तस्करी प्रकरणी दोघांना अटक. पाच कोटी साठ लाख 94 हजार किंमत असणारे 5.694 ग्रॅम अॅम्बरग्रीस जप्त. कोकण रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दल, मडगाव यांची संयुक्त कारवाई.
पालवाडा उसगाव येथे अंदाजे तीन ते अडीच वर्षाचा बछडा सडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याची पायाची चारही नखे नसल्याने त्यांची तस्करी झाल्याचा संशय.
मुख्य रस्त्याच्या बाजूलाच हा बिबट्या मृतावस्थेत आढळला. एक दोन दिवसापुर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज.
गोव्यातील एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांसहीत शिष्टमंडळाने घेतली केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांची भेट.
मुख्यमंत्री सावंत यांच्यासह सभापती तवडकर, मंत्री गावडे, मंत्री आलेक्स सिक्वेरा, माजी मंत्री प्रकाश वेळीप व इतरांचा शिष्टमंडळात समावेश.
कणकवलीत तस्करी होणारे 56,400 रुपये किंमतीचे मद्य पत्रादेवी येथे जप्त करण्यात आले आहे. मोपा पोलिसांनी वाहन चालक रॉनी फर्नांडिस याला ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरु आहे.
मतदारसंघातील डोंगरकापणी आणि बेकायदेशीर बांधकाम प्रकल्पांची कागदपत्रे देत नसल्याच्या कारणावरून आमदार वीरेश बोरकारांचे पणजी टीसीपी कार्यालयात ठिय्या आंदोलन. जोपर्यंत कागदपत्रे देत नाही तोपर्यंत उठणार नसल्याची बोरकरांची भूमिका.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची दिल्लीत भेट घेतली. राज्याच्या विकासासंबधित विविध मुद्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली, असे यादव म्हणाले.
पणशे पिसूर्ले सत्तरी येथील एका 22 वर्षीय युवतीची काल गुरुवारी (ता.15) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन. वाळपई पोलिसात अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद. पोलीस आत्महत्येमागील कारणाचा शोध घेत आहेत.
मिशन राजकीय आरक्षणाचे प्रवक्ते गोविंद शिरोडकर, गोमंतक गौड मराठा समाजाचे नेते मधू गावकर आणि अन्य एसटी नेत्यांनी एसटी आरक्षण व डिलिमीटेशन आयोग स्थापनेबाबत दिल्ली येथे पाठविलेल्या शिष्टमंडळाला यश येण्यासाठी सांगे येथील पाईकदेव देवस्थानात गाऱ्हाणे घातले.
नेसाय येथील एका बंगल्याबाहेर पार्क केलेल्या दोन दुचाकींना अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना घडली आहे. पुढील तपास सुरू.
खोर्जुवे, हळदोणा येथे 23 वर्षीय युवकावर प्राणघातक हल्ला. जखमी प्रणव फडते (हळदोणा) याला उपचारासाठी गोमेकॉत केले दाखल. म्हापसा पोलिसांकडून तिघा अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल. गुरुवारी (ता. 15) रात्री उशिराची घटना.
अद्ययावत कामे पूर्ण करून राज्यात अखंडित वीजपुरवठा देण्याचा सरकारचा मानस आहे, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. बांदोडा येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानाजवळ ३३ केव्ही वेर्णा १ आणि २ वीजवाहिन्यांच्या स्थलांतरित पायाभरणीनंतर ते बोलत होते.
महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या विरोधातील अल्पवयीन मुलीवर कथित बलात्कार प्रकरणाच्या खटल्याची पुढील सुनावणी येत्या बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.