Goa TMC Dainik Gomantak
गोवा

Goa TMC: 40,000 बेरोजगारांना 4,000 नोकऱ्या पुरेशा आहेत का ? गोवा टीएमसी आक्रमक

मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासनावरुन मुख्यंत्र्यांवर साधला निशाणा

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा राज्यातील युवकांनी दोन दिवसांच्या मेगा जॉब फेअरला मोठा प्रतिसाद दिला आहे. या मेळाव्यामध्ये हजारो युवकांनी आपली नोंदणी करत सहभाग नोंदवला आहे. यावरुनच गोवा टीएमसीने आक्रमक होत सरकारला चाळीस हजार युवकांना चार हजार नोकऱ्या पुरेशा आहेत का ? असा खडा सवाल केला आहे.

( Tmc leader trojan d'mello alleged goa government )

तृणमुल काँग्रेसचे माध्यम समन्वयक ट्रोजन डिमेलो यांनी आज पणजी येथे पत्रकार परिषद घेतली. या परिषदेदरम्यान डिमेलो यांनी गोवा सरकार अनेक मुद्यांवरुन निशाणा साधला आहे. याबाबत बोलताना डिमेलो म्हणाले की, गोवा सरकारने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याला राज्यातील युवक युवतींनी मोठा प्रतिसाद दिला आहे. हे सांगण्यास आम्हाला खेद वाटतो कारण गोवा राज्यात युवक - युवती बेरोजगारीचे प्रमाण किती आहे. हे समजते असे ते म्हणाले.

4,000 नोकऱ्या 40,000 युवक - युवतींना पुरेशा आहेत का?

रोजगार मेळाव्यावरुन सरकारवर निशाणा साधताना म्हटले की या रोजगार मेळाव्यात दोन दिवसात सुमारे 40,000 युवकांनी नोकरीसाठी हजेरी लावली आहे. पण गोवा सरकार म्हणते आहे की, आम्ही याद्वारे सुमारे 4,000 युवक - युवतींना नोकरीची संधी मिळणार आहे. असे असेल तर 4,000 नोकऱ्या 40,000 युवक - युवतींना पुरेशा आहेत का? याचं उत्तर गोवा सरकारनेच द्यावे असे ही डिमेलो यांनी म्हटले आहे.

यावेळी डिमेलो यांनी सावंत सरकारने निवडणुकीपूर्वी मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले होते. याची आठवण करुन देत सध्याचं वास्तव वेगळे सागंण्याची गरज नाही असे ही म्हटले आहे. त्यामूळे डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यांच्या आश्वासनाची पूर्तता न करता लोकांच्या समस्या वाढवल्याचं म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT