Goa Tourist: दर्जेदार पर्यटनासाठी साधनसुविधा आवश्‍यक

Goa Tourist: तज्ज्ञांचे मत : राज्यात जलक्रीडा उपक्रमांत बेकायदा व्यवहार
Tourist in Goa | Goa News
Tourist in Goa | Goa News Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourists: पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सध्या पर्यटन खात्याकडून प्रयत्न केले जात असले, तरी त्यासाठी लागणारी साधनसुविधा उपलब्ध नसल्याने इतर राज्याकडे पर्यटक वळू लागले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटकात,केरळमध्ये उच्च दर्जाची साधनसुविधा तयार केली जात असल्याने भविष्यात पर्यटक त्या राज्याकडे वळण्याची शक्यता आहे. दर्जेदार पर्यटनावाढीसाठी अत्याधुनिक साधनसुविधांची आवश्‍यकता आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

कर्नाटकने केंद्राकडून सागरमाला अंर्तगत सुमारे 800 कोटी रुपये निधी देण्याचा मागणी केली असून बाइंदूर, मंगळूर आणि मालपे येथे मरिना बांधण्याचा प्रस्ताव मांडला आहे. प्रकल्प शेजारच्या राज्यांमध्ये आल्यास गोव्यातील पर्यटन उद्योगासाठी हे मारक ठरणार आहे. देवगड व मालवण आणि कर्नाटकातील कारवार येथे जलक्रीडा उपक्रम बऱ्यापैकी सुरू झाल्यानंतर गोव्यातील जलक्रीडा उपक्रमाला प्रतिस्पर्धी निर्माण झाले आहे.

जलक्रीडा स्पर्धेची गरज

गोव्यात समुद्रात किंवा नदीत होणारी एकही वार्षिक स्पर्धा आयोजित केली जात नाही. अशा स्पर्धा होणे गरजेचे आहे.ळे पर्यटक दुबईसारख्या ठिकाणी जातात. शेजारच्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमध्ये साधन सुविधा बांधण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत, असे मिलिंद प्रभू म्हणाले.

Tourist in Goa | Goa News
Babush Monserrate: जमावाला भडकावण्यास बाबूश मोन्सेरात जबाबदार

"गोव्यात स्पोर्ट्स आणि साहसी पर्यटनाच्या माध्यमाने उच्च दर्जाच्या पर्यटकांना आकर्षित करायचे असेल तर सरकारचे स्पष्ट धोरण हवे. गुंतवणूकदारांना प्रेरित करण्यासाठी एक खिडकी प्रणाली असणे महत्त्वाचे आहे, असे झाल्यास गोव्यात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असलेल्यांना सकारात्मक संदेश जाणार आहे."

- सावियो मेसेएस, माजी टीटीएजी अध्यक्ष

"हॉट एअर बलून, स्कूबा डायव्हिंग, रिव्हर राफ्टिंग, बंजी जंपिंग सारखे स्पोर्ट्स आणि साहसी उपक्रम पर्यटन खात्याकडून सुरू केले आहे. समुद्र आणि नदीशी संबंधित स्पोर्ट्स आणि साहसी पर्यटन उपक्रम सुरू करण्यासाठी अत्याधुनिक साधन सुविधा उपलब्ध नाही. कोची येथे मरिना प्रकल्प असल्याने व्होल्वो ओशन रेस त्या मार्गीने जात आहे."

-निखिल देसाई,पर्यटन खात्याचे संचालक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com