Nightclub is not a tourist attraction of Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: क्लब ही गोव्याची खरी ओळख नव्हे

टिटो नाईट क्लब (Tito's nightclub) म्हणजे गोव्याचे (Goa) पर्यटन नव्हे, असा लेख समाज माध्यमावर लिहून सरकारचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: टिटो नाईट क्लबच्या (Tito's nightclub) मालकांनी गोव्यातील (Goa) व्यवसायांवरील मालकी विकण्याचे जाहीर करताना या निर्णयासाठी सरकारी यंत्रणा जबाबदार असल्याचे शरसंधान केले होते. यावरून सरकारवर सामाजिक माध्यमांवर टिकेची झोड उठल्यानंतर, भाजपचे सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर (Adv. Narendra Sawaikar) यांनी तो क्लब म्हणजे गोव्याचे पर्यटन नव्हे, असा लेख समाज माध्यमावर लिहून सरकारचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. (Tito nightclub is not a tourist attraction of Goa)

ॲड. सावईकर यांनी फेसबुकवर म्हटले आहे, की एका नाईट क्लबच्या मालकाने तो क्लब बंद करत असल्याचे समाज माध्यमांवर जाहीर केले. ते करताना आपल्या वाट्याची पूर्ण भरपाई आपल्याला मिळाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पण, सरतेशेवटी प्रशासन, त्यातील अधिकारी व इतरांच्या जाचाला आपण कंटाळल्याचेही त्याने म्हटले. 1971 साली स्थापन झालेल्या या क्लबमुळे त्या भागातील पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्यांना निश्चित फायदा झाला असणार. गेली 50 वर्षे त्या क्लबने सर्व कायदे पाळून (काही वेळा वाकवूनही) व वेळोवेळी सरकारी अधिकारी व जनप्रतिनिधी यांचे सहकार्य घेतले असणार असे मानल्यास काही चुकीचे ठरणार नाही. एखादा व्यवहार बंद करताना किंवा सोडताना यंत्रणेला दोष का द्यायचा? व्यवहार सुरू करताना व चालवताना हीच यंत्रणा होती. वेळप्रसंगी त्यांचे सहकार्यही घेतले असणार. आता हा दोषारोप का?

हे म्हणजे दुसऱ्याकडे बोट दाखवून आपले निरापरिधत्व सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यासारखे आहे. अशा क्लबमध्ये ज्याची ऐपत आहे असाच देशी व विदेशी ग्राहक जाणार व सामान्य गोमंतकीयांचा संबंध मात्र पर्यटन व्यवसायाशी निगडित व्यवहारापुरताच असणार. विकायचा किंवा सोडायचाच होता तर मुकाट्याने व्यवहार करून बाजूला व्हायचे. तो टिवटिवाट कशासाठी? दोषारोप करून सवंग प्रसिद्धीसाठी? की, नवीन व्यस्थापनेच्या ओळखीसाठी आणि त्यांचा जम बसवण्यासाठी? अशी विचारणा त्यांनी केली आहे.

क्लब ही गोव्याची खरी ओळख नव्हे

क्लब ही काही गोव्याची खरी ओळख नाही. गोव्यामुळे व गोवा नावामुळे क्लबला ओळख मिळाली हे त्यातील खरे वास्तव्य आहे. एक क्लब दुसऱ्या व्यवस्थापनेने विकत घेतला किंवा चालवायला घेतला म्हणून काही सांगेतील बुडबुड्यांच्या तळीतील बुडबुडे बंद होणार नाहीत किंवा कुळ्याचा दूधसागर आटणार नाही, असेही सावईकर म्हणाले.

वेगवेगळी निसर्ग ठिकाणे हा खरा गोवा...

गोव्यातील अण्णाची पाव-भाजी, सुरेशचे सामोसे, सूर्यकांतच्या हॉटेलमधील गरम मिरची, कमलाकांतच्या गाड्यावरील भजी ही गोव्याची खरी ओळख आहे. अंत्रुज महालातील देवळे, पावसाळ्यात वेर्ले-साळजीणी येथील ओला चिंब निसर्ग, मासे व मांसाहारी खवय्यासाठीची वेगवेगळी ठिकाणे हा खरा गोवा आहे व हे गोव्याच्या पर्यटनाचे महत्त्वपूर्ण मानबिंदू आहेत, असेही त्यांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चोरीसाठी चोरट्याचा अजब जुगाड! सुपरमार्केटमध्ये पिशवी घेवून गेला अन्…. Viral Video एकदा बघाच

अग्रलेख: कष्टकऱ्यांचा आनंदोत्सव! ख्रिस्तीकरणानंतरही पूर्वकालीन संकेत विसरले नाहीत; गोमंतकीयांच्या भक्तीचा 'सांगडोत्सव'

बहिणीच्या छातीवर बुक्की मारली, आमची लायकी काढली; मुंबईतील 13 पर्यटकांना लुथरा बंधुंच्या कल्बमध्ये मारहाण, अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप

अग्रलेख: ‘आत्मघाती’ पळवाटा कशा थांबवायच्या? कमी गुण मिळाल्याने मुलांनी संपवले जीवन; पालक, शिक्षक अन् समाजासाठी धोक्याची घंटा

Verna Fire : गोव्यात 'आगीचं सत्र' सुरूच! हडफडे घटनेची धग कायम असतानाच, वेर्णा येथील भंगारअड्ड्याला भीषण; कारण अस्पष्ट

SCROLL FOR NEXT