Goa Tourism: यंदाही ‘दूधसागर’चे पर्यटन दुर्मिळच

दूधसागरला (Dudhsagar) जाण्यासाठी हौशी पर्यटकांकडून (Tourist) ‘कॅसलरॉक’हून (Castlerock) 13 कि.मी.ची पायपीट
दुधसागर धबधब्याचे विहंगम दृष्य
दुधसागर धबधब्याचे विहंगम दृष्यDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटामुळे देशातील तरूणांचे आकर्षण बनलेला दूधसागरचा धबधबा (Dudhsagar Waterfall) यंदाही पर्यटकांसाठी (Tourist) दुर्मिळच बनला आहे. अद्याप, गोवा सरकार (Government of goa) किंवा रेल्वे खात्याने पर्यटनबंदीचा आदेश जारी केला नसला, तरी संचारबंदी आणि कोरोनाचे सावट पर्यटनावर आहेत. तरीही काही हौशी पर्यटक कॅसलरॉकहून 13 कि.मी.ची पायपीट करून धबधब्यात स्नानाचा आनंद लुटत आहेत. (Dudhsagar waterfall is likely to remain closed)

गोवा आणि कर्नाटकाच्या सीमेवरील दूधसागर धबधबा हा पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. पण, गेल्या काही वर्षांपासून येथील पर्यटन धोक्याचे बनले आहे. याठिकाणी जाण्यासाठी वाहनांची सोय नव्हती. अलिकडे गोवा सरकारच्या पर्यटन विभागाने ती उपलब्‍ध करून दिल्याने देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी होत असतानाच कोविडच्‍या संकटाने दूधसागरचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. तत्पूर्वी, पर्यटकांकडून रेल्वेवर होणारी दगडफेक, कुंडात पर्यटक बुडाल्याच्या घटनांमुळे पर्यटनावर निर्बंध घालण्यात आले होते. ते उठवून अलिकडे रेल्वे खात्याने काही सुधारणा त्या ठिकाणी केल्या आहेत.

दुधसागर धबधब्याचे विहंगम दृष्य
Goa: आग्वाद किल्ल्याला खासगीकरणाचे ग्रहण?

गतवर्षी कोविडमुळे दुधसागर पाहण्याची संधी पर्यटकांनी गमावली होती. यंदा ही संधी मिळेल असे वाटत असतांना अद्याप दोन्ही राज्यातील टाळेबंदी शिथिल झाली नसल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. रेल्वे अद्याप रुळावर आली नसल्याने ‘दुधसागर’ला भेट देण्याची संधी मिळत नसल्याने पर्यटकांत नाराजीचा सूर आहे. तरीही काही हौशी पर्यटक कॅसलरॉक येथे दुचाकी आणि चारचाकीवरून येऊन तेथून 13 कि.मी.ची पायपीट करून फेसाळणाऱ्या दुधसागराचा अस्वाद घेत आहेत.

गोव्यातील मडगाव ते कॅसलरॉकपर्यंतचा मार्ग हा पूर्वी ‘वेस्ट ऑफ इंडियन-पोर्तुगीज गॅरेंटेड’ कंपनीचा भाग होता. बराच काळ ‘कॅसलरॉक’ हे ब्रिटीश आणि पोर्तुगीज यांच्यातील समन्वयाचे केंद्र होते. ती स्थलांतर चौकी होती. त्याशिवाय, दूधसागर बघण्यासाठी दोन्हीकडचे अधिकारी त्याठिकाणी येत असत. अलिकडे बऱ्याच कारणांनी दूधसागरचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. यंदा अद्याप पर्यटनबंदीचा आदेश जारी केलेला नाही. पण, कोविडच्या संकटामुळे पर्यटकांना तेथे जाण्यास मनाई केली असल्याची माहिती नैॠत्य रेल्वेचे मुख्य प्रसिद्धी अनिश हेगडे यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com