Tennis Tournament Dainik Gomantak
गोवा

Tennis Tournament: विजेतेपद पटकावत खुल्या टेनिसमध्ये तिथी, दर्शचा दबदबा

पणजी जिमखान्यावर आयोजन: दुहेरी विजेतेपदाचा मान

गोमन्तक डिजिटल टीम

Tennis Tournament पणजी जिमखान्याने गोवा राज्य टेनिस संघटनेच्या सहकार्याने घेतलेल्या टीएनएस खुल्या टेनिस स्पर्धेत तिथी भूमकर व दर्श पै यांनी वर्चस्व राखले. त्यांनी दुहेरी किताबाचा मान मिळवताना अनुक्रमे 14 आणि 18 वर्षांखालील मुली व मुलांत विजेतेपद पटकावले.

स्पर्धा कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या टेनिस कोर्टवर झाली. राजेंद्र गुदिन्हो याने धडाका राखताना पुरुष दुहेरी, मिश्र दुहेरी आणि 45 वर्षांवरील व्हेटरन्स दुहेरीत बाजी मारली.

जिवलग मैत्रीणी असलेल्या तिथी आणि विधी नाईक यांच्यात 14 वर्षांखालील आणि 18 वर्षांखालील मुलींच्या एकेरीत विजेतेपदासाठी झुंज झाली. तिथीने दोन्ही अंतिम लढतीत वरचष्मा राखताना अनुक्रमे 4-0, 4-0 आणि 6-4, 6-3 फरकाने विजय प्राप्त केला.

दर्श याने 14 वर्षांखालील मुलांच्या एकेरीतील अंतिम लढतीत व्हिवान अगरवाल याच्यावर 4-1, 4-0 असा पराभव केला, तर 18 वर्षांखालील एकेरीत गौरांग फुटणकर याच्यावर 6-3-, 6-3 अशी मात केली.

व्हेटरन्स गटात मानो छाब्रा याने 45 वर्षांवरील पुरुष एकेरीत, बुलू व मानो यांनी पुरुष दुहेरीत, 55 वर्षांवरील व्हेटरन्स दुहेरीत डेव्हिड व संजय जोडीने विजेतेपद मिळविले.

इतर प्रमुख अंतिम निकाल:-

  • महिला एकेरी: मान्युएला गोम्स वि. वि. तान्या शेलियाझिन्स्का-काल्देरा 6-1, 6-0,

  • पुरुष एकेरी: तेजस शेवडे वि. वि. सूरज सदाना 6-0, 6-1.

  • पुरुष दुहेरी: राजेंद्र गुदिन्हो व रिचर्ड लॉकहार्ट स्मिथ वि. वि. सचिन दुकळे व राजाराम कुंडईकर 5-7, 6-4 (सामना सोडला),

  • मिश्र दुहेरी: राजेंद्र गुदिन्हो व तान्या शेलियाझिन्स्का-काल्देरा वि. वि. संतोष गोरावर व अर्चना देसाई 4-0, 4-2

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT