Tirumala Tirupati Cooperative Credit Society Goa Dainik Gomantak
गोवा

Tirumala Tirupati Goa: ‘तिरुमला तिरुपती’चे गुंतवणूकदार धास्तावले! नियमभंग भोवला; राज्‍यभरातील विविध शाखांमध्‍ये पैशांसाठी झुंबड

Tirumala Tirupati Cooperative Credit Society Goa: ‘एनओसी’ अचानक रद्द केल्यानंतर बुधवारी राज्‍यभरातील विविध शाखांमध्‍ये पैसे काढण्‍यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: ऑडिट अहवाल सादर करण्यास वारंवार टाळाटाळ करणाऱ्या तिरुमला तिरुपती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला १३ शाखा सुरू करण्यासाठी देण्यात आलेली ‘एनओसी’ सहकार निबंधकांनी मंगळवारी अचानक रद्द केल्यानंतर बुधवारी राज्‍यभरातील विविध शाखांमध्‍ये पैसे काढण्‍यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली.

या सोसायटीच्‍या गुंतवणूकदारांमध्ये सध्‍या भीतीचे वातावरण पसरले आहे. त्‍यामुळेच पाटो-पणजीसह इतर ठिकाणच्या शाखांमध्ये पैसे काढण्यासाठी गुंतवणूकदारांनी मोठी गर्दी केलेली दिसून आली. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे संबंधित शाखांतील कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.

तिरुमला तिरुपती सोसायटीला सहकार खात्याने १३ शाखा सुरू करण्यासाठी ‘एनओसी’ दिली होती. मात्र, व्यवस्थापनाने आवश्यक परवाने न घेता चार शाखा सुरू केल्याचे उघड झाले. दुसरीकडे, वारंवार सूचना देऊनही सोसायटीकडून अद्याप ऑडिट अहवाल सादर करण्यात आलेला नाही. या गंभीर नियमभंगामुळे सहकार निबंधक आशुतोष आपटे यांनी काल मंगळवारी एनओसी रद्द करण्याचा निर्णय घेतला.

एनओसी रद्द करण्यात आली असली तरी सध्या सुरू असलेल्या शाखा बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत. मात्र, गुंतवणूकदारांनी सोसायटीशी व्यवहार करताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन सहकार निबंधकांनी केले आहे. ही माहिती समजताच पाटो-पणजीसह इतर शाखांमध्ये ठेवीदारांनी आपले पैसे काढण्यासाठी गर्दी केली. अनेक ठिकाणी दिवसभर व्यवहारासाठी रांगा लागल्या होत्या.

मुख्यमंत्र्यांकडून कागदपत्रांसाठी आजपर्यंत अल्टिमेटम

तिरुमला तिरुपती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या प्रतिनिधींनी आज बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. यावेळी प्रलंबित कागदपत्रांबाबत चर्चा झाली. सहकार निबंधकांकडून सोसायटीबाबत काही गंभीर हरकती व शंका उपस्थित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सहकार निबंधकांनी मागितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे तातडीने सादर करणे सोसायटीला बंधनकारक आहे. उद्यापर्यंत ही कागदपत्रे सादर करण्याचे स्पष्ट निर्देश मी दिले आहेत. त्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल. सहकारी संस्थांच्या कारभारात पारदर्शकता व नियमपालन आवश्यक असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.

एनओसी रद्द का केली?

१ १३ शाखांसाठी एनओसी मिळूनही आवश्यक परवाने न घेता ४ शाखा केल्‍या सुरू.

२ वारंवार निर्देश देऊनही ऑडिट अहवाल केला नाही सादर

३ सहकार खात्याच्या अटींचा गंभीर भंग

४  सहकार निबंधकांचा थेट कारवाईचा निर्णय

ऑडिट नाही, परवाने नाहीत

तिरुमला तिरुपती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पणजी शाखेने बुधवारी सहकार निबंधकांना पत्र पाठवून ‘कारणे दाखवा’ नोटीस तसेच एनओसी निलंबन मागे घेण्याची विनंती केली आहे. शाखेचे प्रतिनिधी दीप्तेश सावंत यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर न केल्याबद्दल माफी मागत, सर्व कागदपत्रे तातडीने सादर करण्याची हमी दिली आहे.

सोसायटीच्या प्रतिनिधींना गुरुवारपर्यंत सर्व प्रलंबित कागदपत्रे सहकार निबंधकांकडे सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. कागदपत्रे सादर झाल्यानंतर मी स्वतः त्यांची पडताळणी करेन.
डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT