तिरुमला तिरुपती मंडळाने जानेवारीसाठी जारी केली विशेष तिकिटं

तिरुमला तिरुपती मंडळाने दिलेल्या माहितीनुसार जानेवारीसाठी 460,000 ऑनलाइन तिकिटांची घोषणा करण्यात आली
Tirumala Tirupati Mandal issues special tickets for January

Tirumala Tirupati Mandal issues special tickets for January

Dainik Gomantak

Published on
Updated on

देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापैकी एक असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थाने (Tirumala Tirupati Mandal) ऑनलाइन तिकिटे जारी केली आहेत. दर्शन तिकिटांची प्रचंड मागणी असताना हजारो भाविकांनी तिरुमला तिरुपती देवस्थानच्या वेबसाइटवर लॉग इन केले. शुक्रवारी, बोर्डाने जानेवारीसाठी 460,000 ऑनलाइन तिकिटांची घोषणा केली.

ही तिकिटं जाहिर होताच वेबसाइटला 14 लाख हिट्स मिळाल्या. मात्र, 55 मिनिटांत ही पुर्ण तिकीटं बुक झाल्याने संपूर्ण कोट्यासह वाटप प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली, असे अहवालात सांगण्यात आले. बोर्डाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर आधीच जानेवारीसाठी विशेष प्रवेश दर्शन कोटा पूर्णपणे आरक्षित झाला असल्याचे सांगितले.

<div class="paragraphs"><p>Tirumala Tirupati Mandal issues special tickets for January</p></div>
60 वर्षावरील लोकांना दिला जाणार बूस्टर डोस, लागणार 'ही' कागदपत्र

1 जानेवारी पासून या तिकाटांचे वाटप होणार आहे. 13 ते 22 जानेवारी आणि 2 ते 12 जानेवारी या कालावधीत दररोज 20,000 तिकिटे आणि 23 ते 31 जानेवारी प्रतिदिन 12,000 तिकिटे जारी केली जोतील. दुसरीकडे, 1, 2, 13 जानेवारीसाठी 5,500 आभासी तिकिट सेवा ऑनलाइन जारी केली जाणार आहे. तिरुमला तिरुपती देवस्थान (Tirumala Tirupati Mandal) तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वराच्या दर्शनासाठी जानेवारीमध्ये सर्वदर्शन तिकिटांसाठी 155,000 तिकिटे देखील जारी करणार असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. एका सुपर स्पेशालिटी चिल्ड्रन हॉस्पिटलच्या बांधकामासह तीन मोठ्या प्रकल्पांसाठी हा निधी उभारण्यासाठी बोर्ड अर्जित सेवा वाटप करण्याच्या तयारीत आहे, असे अहवाल सूचित करण्यात आले. हि तिकिटे ऑनलाइन (online tickets) आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे उपलब्ध असणार. शुक्रवार वगळता सर्व दिवस प्रत्येक तिकिटाची किंमत एक कोटी रुपये असेल. यामध्ये शुक्रवारचे तिकीट 1.50 कोटी रुपयांना मिळणार आहे. या वाटपातून मंडळाला 600 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.

<div class="paragraphs"><p>Tirumala Tirupati Mandal issues special tickets for January</p></div>
देशात ओमिक्रोनची संख्या 500 च्या पार

उदयस्थमन अर्जित सेवा 1981 मध्ये सुरू करण्यात आली होती, परंतु 1995 मध्ये अधिकृतपणे हि सेवा बंद झाल्यानंतर पुन्हा 2006 मध्ये सुरू करण्यात आली. सुरवातीला या तिकिटांची किंमत 1 लाख होती. मंडळाने सुमारे 2,600 तिकिटांची विक्री केली. मात्र त्यापैकी 531 तिकिटे वापराविना पडली आहेत. आता बोर्डाने ही तिकिटे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे, असे अहवालात म्हटले आहे.

दर्शनासाठी Covid-19 नकारात्मक अहवाल आणि दोन्ही लसीकरणाचे प्रमाणपत्र भक्तांना बंदनकारक असणार आहे . भाविकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असताना मंडळाने भाविकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com