Tiatr Goa No. 1 Marathi news website in India esakal.com
गोवा

Tiatr Goa: संगीत कार्यक्रमांना 'हाऊसी' मुळे प्रेक्षक मिळतो तसाच तियात्राना‌ का मिळू नये?

Tiatr audience engagement: तियात्र क्षेत्राची आजची परिस्थिती फार निराशाजनक आहे. प्रेक्षकांच्या संख्येत कमालीची घट झालेली आहे व त्यामुळे अनेक दिग्दर्शक आणि अभिनेते निराश बनले आहेत.

Sameer Panditrao

मारियो पिरीस 

पणजी: तियात्र क्षेत्राची आजची परिस्थिती फार निराशाजनक आहे. प्रेक्षकांच्या संख्येत कमालीची घट झालेली आहे व त्यामुळे अनेक दिग्दर्शक आणि अभिनेते निराश बनले आहेत. त्याचबरोबर असंख्य नवोदित तियात्र लेखक-दिग्दर्शक आपले कौशल्य रंगमंचावर प्रदर्शित करण्यास उत्सुक आहेत. या नवीन त्या तियात्रीस्टांनी आपला ठसा उमटवण्याच्या‌ आशेने मोठ्या कलाकारांसह आपली निर्मिती केली आहे परंतु प्रेक्षकांच्या अल्प प्रतिसादामुळे त्यांनाही आर्थिक नुकसान भोगावे लागले आहे. या परिस्थितीवर उपाय काय? 

तियात्र सादरीकरणाव्यतिरिक्त आज शहरातील सभागृहांमध्ये आणि खेड्यांमध्येही अनेक संगीत कार्यक्रमाचे आयोजन होत असते आणि या संगीत कार्यक्रमात प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आयोजकांनी एका अभिनव कल्पनेचा वापर केला आहे.

ही कल्पना म्हणजे 'हाऊसी' खेळ! कार्यक्रमाच्या मध्यंतरात हा खेळ खेळला जातो ज्यातून उपस्थित प्रेक्षकांना लाखो रुपये जिंकण्याची संधीही मिळते. त्यामुळे या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आला आहे. अनेक प्रेक्षक तर केवळ बक्षीस जिंकण्याच्या आशेने या कार्यक्रमाला उपस्थित राहताना दिसतात. अलीकडेच दक्षिण गोव्यातील अशा एका कार्यक्रमाला प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळली होती.

आता प्रश्न हा आहे की ही हाउसी खेळाची कल्पना तियात्रासाठी वापरली जाऊ शकते काय? त्यातून तियात्राला प्रेक्षकांचा उत्साही प्रतिसाद मिळू शकेल काय? हाऊसीमुळे संगीत कार्यक्रमांसाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी अनुभवलेल्या एका व्यक्तीचे मत आहे की तियात्र कलाकारांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीनंतर, प्रेक्षकांच्या कमी उपस्थितीला सामोरे जाणे हे त्या कलाकारांसाठी निराशाजनक असते.

मात्र तियात्राच्या मध्यंतरात हाऊसी खेळाचा अवलंब केला गेला तर प्रेक्षकांना मोठ्या संख्येने आकर्षित करण्यात त्याचा नक्कीच फायदा होईल. असेच मत आणखी एका तियात्र शौकिनानेही व्यक्त केले; ज्याप्रमाणे संगीत कार्यक्रमांना हाऊजी मुळे प्रेक्षक मिळतो तसाच तियात्राना‌ का मिळू नये? 

आज प्रेक्षकांविना तियात्रांचे जे नुकसान होत आहे ते थांबवण्यासाठी कदाचित हाऊसीचा प्रयोग योग्य ठरू शकेल काय आणि तो प्रेक्षकांना तियात्रांकडे पुन्हा घेऊन येऊ शकेल काय? जर तसे झाले तर दिग्दर्शक आणि कलाकारांना फायदा होण्याबरोबरच तियात्र क्षेत्रालाही नक्कीच संजीवनी मिळेल. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT