Tiatr Academy: तियात्र भवन मडगावातच उभारणार; जागा निश्चित करण्याची मंत्री गावडे यांच्याकडून सूचना

Tiatr Academy of Goa: गोवा तियात्र अकादमीकडून बांधले जाणारे नियोजित तियात्र भवन मडगाव भागातच उभारले जाणार असल्याचे संकेत आज कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी दिले
Tiatr Academy of Goa: गोवा तियात्र अकादमीकडून बांधले जाणारे नियोजित तियात्र भवन मडगाव भागातच उभारले जाणार असल्याचे संकेत आज कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी दिले
Tiatr Academy of GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव, ता. १६ (खास प्रतिनिधी) सासष्टी हे तियात्र कलेचे आगर असल्याने गोवा तियात्र अकादमीकडून बांधले जाणारे नियोजित तियात्र भवन मडगाव भागातच उभारले जाणार असल्याचे संकेत आज कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी दिले. हे भवन उभारण्यासाठी जागा निश्चित करावी अशी सूचनाही त्यांनी केली.

गोवा तियात्र अकादमीच्या कार्यकारी मंडळाची आज मंत्री गावडे यांच्या बरोबर बैठक झाली. अकादमीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अँथनी बार्बोजा यांचे यावेळी पुष्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मावळते अध्यक्ष मिनिन फर्नांडीस आणि अन्य पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

यावेळी तियात्र अकादमीतर्फे नवीन मुलांना तियात्रमधील पारंपरिक वाद्ये वाजविण्याचे प्रशिक्षण देणारे वर्ग सुरू करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. सरकार त्यासाठी प्रशिक्षकांची नियुक्ती लावकरच करणार असून मडगाव व पणजी या दोन ठिकाणी हे वर्ग घेतले जातील अशी माहिती बार्बोजा यांनी दिली.

तियात्र कलाकारांना अडचणीच्या वेळी मदत मिळावी यासाठी त्यांना सामूहिक आरोग्य विमा सुरू करण्याचा प्रस्ताव सरकार समोर ठेवला असून हा प्रस्तावही मान्य करण्याचे आश्वासन मंत्री गावडे यांनी दिले आहे अशी माहिती बार्बोजा यानी दिली.

Tiatr Academy of Goa: गोवा तियात्र अकादमीकडून बांधले जाणारे नियोजित तियात्र भवन मडगाव भागातच उभारले जाणार असल्याचे संकेत आज कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी दिले
Calangute Crime: 'नाईट लाईफ' नव्हे ही तर वाईट लाईफ! कळंगूटची प्रतिमा मलीन का होतेय?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

rent a car driver attack case
Goa municipal administrator appointment
Bison Attack Death Betoda Goa
Goa Dinesh Gawade Death Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com