Dr Pramod Sawant Chief Minister of Goa
Dr Pramod Sawant Chief Minister of Goa Dainik Gomantak
गोवा

Thunderstorm In Goa: न्हावेली-साखळीला चक्रीवादळाचा तडाखा, मुख्यमंत्र्यांनी केली पडझडीची पाहणी

गोमन्तक डिजिटल टीम

Thunderstorm In Goa

साखळी मतदारसंघातील न्हावेली पंचायत क्षेत्रात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पाहणी केली. मेस्तवाडा, कातरवाडा या भागामध्ये या चक्रीवादळाचा मोठा प्रभाव दिसून आला.

सुमारे दहा घरांवर झाडे पडली, तर चार बागायतदारांची झाडे पडून नासधूस झाल्याने लाखोंची हानी झाली आहे.

गुरुवारी रात्री या भागाला चक्रीवादळाचा तडाखा बसला. यावेळी अनेक घरांवर झाडे पडली, काही घरांचे पत्रे, पत्र्यांची छप्परे, कौले उडून गेली. तसेच चार बागायतदारांच्या बागायतींमधील माड, पोफळी, काजू, आंबा, नीरफणस, फणस व इतर झाडे उन्मळून पडली.

न्हावेलीत झालेल्या या 66 चक्रीवादळाच्या तडाख्याने अनेक घरांना मार बसला आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून परिश्रम करून वाढविलेली फळझाडे नष्ट झाली आहेत. नुकसानग्रस्तांना मदत देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि सरकारी अधिकारी मालमत्तेच्या नुकसानीचे मूल्यांकन करत असून, मालमत्ता पुनर्संचयित करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. विजेचे खांब आणि इतर सार्वजनिक मालमत्ता त्वरीत पूर्ववत केल्या जातील, असेही सावंत म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घोडगावयलो

उत्क्रांतीचे झाड

Chhatrapati Shahu Maharaj : छत्रपती शाहू महाराजांचे पुण्यस्मरण

Hit & Run Case : घाेगळ येथे ‘हिट अँड रन’ प्रकरणात पत्रकार जखमी

Garbage Project : वेर्णा येथील कचरा प्रकल्पाला विरोध

SCROLL FOR NEXT