Govind Gaude
Govind GaudeDainik Gomantak

Goa Politics: गोविंद गावडेंचे मंत्रीपद जाणार? मंत्रिमंडळ फेरबदलाचा विचार बळावला

Goa Politics:...अन्यथा संघर्षासाठी तयार राहा, आदिवासींच्या मागण्या पूर्ण करण्यावरुन गावडेंचा सरकारला गर्भित इशारा
Published on

Goa Politics

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यास आठवडा बाकी असतानाच कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे मात्र एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी भाजपने आपल्याला राज्य मंत्रिमंडळात स्थान दिल्यास आपण ते स्वीकारेन, असे स्पष्ट वक्तव्य केल्यामुळे मंत्रिमंडळातून गावडे यांना वगळणार की काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

त्यातच गावडे यांनी कला अकादमी प्रकरणात थेटपणे सार्वजनिक बांधकाम खात्याकडे काही दिवसांपूर्वी बोट दाखविले होते. नीलेश काब्राल यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर हे खाते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वतःकडे ठेवले आहे.

कला अकादमीच्या आधुनिकीकरणात झालेला घोळ आणि कामाचा दर्जा याबाबत कला व संस्कृती खाते नव्हे, तर सार्वजनिक बांधकाम खाते जबाबदार आहे, असे गावडे यांच्या बोलण्याचा रोख होता.

गावडे यांनी आज धारण केलेले आक्रमक रूप पाहता त्यांनी मंत्री ते सामाजिक कार्यकर्ता या रूपापर्यंत असा प्रवास करण्याची मानसिक तयारी केल्याचे दिसते.

Govind Gaude
CM Pramod Sawant: दिल्ली गाजवलेल्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना बढती मिळणार? त्यांनीच दिली एक्सक्लूसिव्ह माहिती video

सर्वच सरकारांकडून आदिवासींचा वापर

पुढील वर्षीच्या प्रेरणा दिनाअगोदर आदिवासी समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा पुन्हा एकदा संघर्षासाठी तयार रहा, असा गर्भित इशारा मंत्री गोविंद गावडे यांनी आपल्याच सरकारला दिला आहे.

अधिकाऱ्यांना काम करण्यास जमत नसेल तर त्यांनी घरी बसावे. प्रत्येक सरकारने आदिवासी समाजाचा वापर केल्याचा आरोपही गावडेंनी केला आहे.

मंत्रिमंडळ फेरबदलाचा विचार बळावला

गावडे यांच्या या वक्तव्याचा वेगळाच राजकीय अर्थ काढला जात आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा विचार भाजपमध्ये बळावला आहे.

मंत्रीच जर आपल्या मतदारसंघात भाजपला हवे तेवढे मताधिक्य देऊ शकत नसतील तर ते काय कामाचे, अशी चर्चा भाजपच्या अंतर्गत वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे गावडे यांचे उद्विग्न होणे वेगळ्या राजकीय चष्यातून सध्या पाहिले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com