Goa Latest Accident News Dainik Gomantak
गोवा

Kone Priol Accident: ओव्हरटेक करण्याच्या नादात दिली दोन कारना धडक, सातजण जखमी

Goa Accident: जखमींना फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती ठीक असल्याची माहिती देण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

Kone Priol Accident

फोंडा: कोने-प्रियोळ मुख्य रस्त्यावर आज गुरुवारी तीन कारगाड्यांच्या टकरीत सातजण जखमी झाले. हा अपघात दुपारी ३.४५ वा.च्या सुमारास घडला.

जीए ०४ एच ०५२६ या क्रमांकाच्या कारने फोंड्याच्या दिशेने जाताना ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या एम एच ०८ एएक्स २४३१ या क्रमांकाच्या महाराष्ट्रातील कारला व पुढे जाऊन जीए ०३ व्ही ०६२६ या क्रमांकाच्या आणखी एका कारला धडकली.

या अपघातात रत्नागिरी येथून देवदर्शनासाठी गोव्यात आलेले निनाद तेंडुलकर, प्रिया तेंडुलकर यांच्यासह सात वर्षीय श्रीरंग तेंडुलकर तसेच गोव्यातील वैभव साखळकर, विद्या साखळकर, विनायक साखळकर आणि अपघाताला कारणीभूत कारचा चालक गोकुळदास नाईक हाही जखमी झाला. जखमींना फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती ठीक असल्याची माहिती देण्यात आली. म्हार्दोळ पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Abhishek Sharma Record: 69 षटकार... अभिषेक शर्माची ऐतिहासिक कामगिरी! सूर्यकुमार यादवचा 4 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

EPFO Advance New Rules: आजारपण, लग्न, शिक्षण अन् घरासाठी PF काढण्याचे नियम बदलले; किती वेळा आणि किती पैसे काढता येणार?

October Temperature: गोव्यात ऑक्टोबरमध्ये उष्णतेचा विक्रम! पणजीत पारा 37.4 अंशांवर, म्हापशात 39.6 अंशांची नोंद

Horoscope: नवरात्रीचा पाचवा दिवस ठरणार भाग्याचा! 5 राशींचे नशीब चमकणार; प्रगतीचे संकेत, आर्थिक लाभाची शक्यता; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Tourist Death: कळंगुटमध्ये उघड्या लोखंडी सळ्यांनी घेतला पर्यटकाचा जीव; बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT