Fishermen Pulling Net 
गोवा

जाळी ओढताना समुद्रकिनारी मच्छीमाराचा मृत्यू तर, घसरुन पडल्याने दोघांनी गमावला जीव

Goa News: छातीत दुखू लागल्याने तो खाली कोसळला अशी माहिती त्याच्या सहकाऱ्यांनी दिली.

Pramod Yadav

मडगाव: गोव्यात सोमवारी (२९ जुलै) एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला. कासावली समुद्रकिनारी मासेमारीची जाळी ओढताना एका मच्छीमार कामगाराचा मृत्यू झाला तर दक्षिण गोव्यात घसरून खाली पडल्याने दोघांना मृत्यू आला.

या दोघांनाही मडगाव येथील जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पहिली घटना फातोर्डा येथे घडली. चंद्रवाडा येथे एका रो हाऊसमध्ये राहणारा विनीत धारेश्वर (५२) हा गच्चीवर घसरून पडून जखमी झाल्याने मृत पावला तर दुसऱ्या घटनेत बागा-आंबेली येथे राहणाऱ्या वियेना लिमोस (८४) ही घरात पडून जखमी झाल्याने तिला इस्पितळात दाखल केले होते. तिथे उपचार चालू असताना तिचे आज निधन झाले.

समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेला होडीतील कामगार जाळे ओढत असताना अचानक खाली कोसळल्याने त्याचे निधन झाले. सोमवारी (२९ जुलै) उघडकीस आलेल्या या घटनेत कम्मार याराना (४५. रा. मूळ आंध्र प्रदेश) याचा मृत्यू झाला.

कम्मार खाली कोसळल्यानंतर त्याला इतर कामगारांनी कासावली येथील आरोग्य केंद्रावर दाखल केले, पण तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

कम्मारचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. पण, छातीत दुखू लागल्याने तो खाली कोसळला अशी माहिती त्याच्या सहकाऱ्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT