एस्मा हटवा! सिप्लाकडून कर्मचाऱ्यांचा छळ, विजय सरदेसाई सभागृहात कडाडले

Goa Assembly Monsoon Session 2024: कामगार मंत्र्यांनी लक्ष घालून एस्मा हटवावा, अशी मागणी सरदेसाईंनी केली.
एस्मा हटवा! सिप्लाकडून कर्मचाऱ्यांचा छळ, विजय सरदेसाई सभागृहात कडाडले
MLA Vijai SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सिप्ला कंपनीकडून कर्मचाऱ्यांचा छळ होत असल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांनी केली होती. याप्रकरणी आमदार विजय सरदेसाई यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले. सरदेसाई यांनी आज (३० जुलै) सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत कामगार मंत्र्यांनी लक्ष घालून लागू केलेला एस्मा देखील हटविण्याची मागणी केली.

अधिवेशनाच्या बाराव्या दिवशी शुन्य काळात बोलताना आमदार विजय सरदेसाई यांनी एस्मा कायद्यामुळे कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत भाष्य केले. कोरोना काळात लागू करण्यात आलेल्या एस्मा कायद्याला त्यानंतर मुदतवाढ देण्यात आली. आता एस्मा Essential Services Maintenance Act (ESMA) कशासाठी हवा. कामगार मंत्र्यांनी लक्ष घालून एस्मा हटवावा, अशी मागणी सरदेसाईंनी केली.

तसेच, सिप्ला कंपनीकडून कर्मचाऱ्यांचा छळ केला जात असून, कर्मचाऱ्यांना सिक्कीम सारख्या ठिकाणी जबरदस्तीने बदली दिली जात असल्याचा उल्लेखही त्यांनी सभागृहात केला.

सिप्ला कंपनीत कर्मचाऱ्यांचा जाच केला जात असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी पणजीतील आझार मैदानावर निषेध आंदोलन करत केली होती. याबाबत त्यांनी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार विजय सरदेसाई यांची देखील भेट घेऊन व्यथा मांडली होती.

एस्मा हटवा! सिप्लाकडून कर्मचाऱ्यांचा छळ, विजय सरदेसाई सभागृहात कडाडले
Goa Casino: गोव्यातील बेकायदेशीर कॅसिनो बंद करणार; विरोधकांनी घेरल्यानंतर CM सावंतांचे आश्वासन

सिप्ला कंपनीत अपघातात महाराष्ट्रातील दोन कामगारांचा मृत्यू झाला यानंतर कंपनीतील इतर कामगारांनी आवाज उठवत त्यांच्यावर अन्याय होत असल्याची तक्रार केली.

कंपनीतील अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी आलेमाव यांच्यासह सरदेसाईंनी सभागृहात केली होती. मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

याचवेळी सरदेसाईंनी कंपनीकडून कर्मचाऱ्यांनी पूर्व कल्पना न देता परराज्यात बदली दिली जात असल्याचेही सभागृहात नमूद केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com