Cylinder Scheme Dainik Gomantak
गोवा

Cylinder Scheme: '3 सिलिंडर' योजनेचा 50 हजार महिलांना लाभ, दीड लाख अर्ज; 40 हजार अर्ज पतींच्या नावाने, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Cylinder Scheme Goa: राज्य सरकारच्या तीन सिलिंडर योजनेचा आतापर्यंत ५० हजार कार्डधारकांना लाभ मिळाला असून, सुमारे दीड लाख लाभार्थ्यांनी योजनेसाठी अर्ज केले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: राज्य सरकारच्या तीन सिलिंडर योजनेचा आतापर्यंत ५० हजार कार्डधारकांना लाभ मिळाला असून, सुमारे दीड लाख लाभार्थ्यांनी योजनेसाठी अर्ज केले आहेत. मात्र, यातील तब्बल ४० हजार अर्ज पतींच्या नावाने दाखल झाले आहेत. त्यामुळे महिलांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आपल्या नावाने करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

मुरगाव येथील रवींद्र भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, वास्कोचे आमदार दाजी साळकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना वाढीव गृहआधार देण्यात येईल, अशी घोषणा सावंत यांनी पुन्हा केली. सरकारने दिलेला शब्द पाळला जाईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच, निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्षांकडून जाहीरनामे प्रसिद्ध केले जातील; नागरिकांनी आश्वासनांची पडताळणी करून निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी उज्ज्वला योजना गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे काम सरकारने केल्याचे सांगितले. दामू नाईक यांनीही सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख केला.

‘ज्यांनी गोव्याची वाट लावली, ते यात्रा काढत आहेत’

काँग्रेसच्या ‘गोवा राखण’ यात्रेवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी टीका केली. गोव्याचे रक्षण करण्यासाठी भाजप सरकार सक्षम असल्याचा दावा त्यांनी केला. सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली असून, आगामी काळात विरोधकांकडून खोटी आश्वासने दिली जाऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला. ‘जाहीरनामे वाचताना सावध राहा,’ असे आवाहन करत भाजप सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.

महिलांचा सन्मान आणि त्यांचे सक्षमीकरण हे सरकारचे प्राधान्य असल्याचे सावंत यांनी नमूद केले. मुलींच्या विवाहासाठी आतापर्यंत सरकारने ९५० कोटी रुपये दिल्याचाही दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

Ranji Trophy: गोव्याची गोलंदाजी पुन्हा निष्प्रभ! बडोद्याचा 472 धावांचा डोंगर; अतीत शेठचे शतक एका धावेने हुकले

SCROLL FOR NEXT