Goa Road Accidents: गोव्यात 'वीकएंड' ठरतोय जीवघेणा! ऑगस्टमध्ये 226 अपघात, 20 सप्टेंबरपर्यंत 188 जणांचा मृत्यू

Goa Weekend Road Accidents: जगप्रसिद्ध पर्यटनस्‍थळ असलेल्या गोव्यात शनिवार आणि रविवार हे आठवड्याच्या अखेरीचे दोन दिवस अधिक धोकादायक ठरत असल्याचे रस्तेअपघातांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
Goa road accident statistics 2026
Goa weekend accident deathsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सुशांत कुंकळयेकर

मडगाव: जगप्रसिद्ध पर्यटनस्‍थळ असलेल्या गोव्यात शनिवार आणि रविवार हे आठवड्याच्या अखेरीचे दोन दिवस अधिक धोकादायक ठरत असल्याचे रस्तेअपघातांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्यातील अपघातांची आकडेवारी पाहता एकूण अपघातांपैकी सुमारे २५ टक्के अपघात या दोन दिवशी घडले आहेत.

शनिवारी झालेल्या अपघातांचे प्रमाण १३.३ टक्के, तर रविवारी झालेल्या अपघातांचे प्रमाण ११.९ टक्के आहे. सप्टेंबरमध्येही हीच स्थिती कायम असल्याचे दिसत आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांत अपघाती मृत्यूंची संख्या अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. १ जानेवारी ते २० सप्टेंबर या कालावधीत गोव्यात रस्तेअपघातांत एकूण १८८ जणांचा मृत्यू झाला आहे.

Goa road accident statistics 2026
Goa Politcs: काँग्रेसने 'गोवा रक्षण यात्रा' नव्हे, 'आमदार राखण यात्रा' काढावी; 'आप'चा खोचक सल्ला, पक्षांतरांवरून निशाणा

१२ सप्टेंबरला पर्वरी उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच ठिकाणी आणखी एक अपघात झाल्याने गोव्यातील ‘अपघाती वीकएंड’ चर्चेचा विषय ठरला आहे.

सप्टेंबरमधील आकडेवारीनुसार, शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांत पहिल्या आठवड्यात तिघांचा, दुसऱ्या आठवड्यात दोघांचा, तर नुकत्याच संपलेल्या तिसऱ्या आठवड्यात चौघांचा अपघाती मृत्यू झाला. अन्य तिघांचा मृत्यू इतर दिवशी झाल्याची नोंद आहे.

गोवा वाहतूक पोलिसांकडून प्राप्त आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिना यंदा अपघातांच्या दृष्टीने चिंताजनक ठरला आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये राज्यात १६६ अपघातांची नोंद झाली होती. यंदा ऑगस्टमध्ये हा आकडा २२६ वर पोहोचला असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत अपघातांमध्ये सुमारे ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यातील १२२ अपघात दिवसा, तर १०४ अपघात रात्री घडले.

ऑगस्टमध्ये रस्तेअपघातांत १९ जणांचा मृत्यू झाला, तर सप्टेंबरच्या २० तारखेपर्यंत १२ जणांचा बळी गेला आहे. पोलिसांच्या निष्कर्षानुसार, सुमारे ९६ टक्के अपघात बेदरकारपणे किंवा चुकीच्या पद्धतीने वाहन चालविल्यामुळे झाले आहेत.

धोकादायक पर्वरी; अपघातांमध्ये तब्‍बल ४०० टक्क्यांनी वाढ

ऑगस्ट महिन्यातील अपघातांचा आढावा घेतला असता, मागील वर्षाच्या तुलनेत पर्वरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत यंदा अपघातांमध्ये ४०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ मोपा, वाळपई आणि म्हार्दोळ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अपघातांमध्ये २०० टक्क्यांनी, तर कुडचडे परिसरात १५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.ऑगस्टमध्ये सर्वाधिक अपघात नोंदलेल्या पोलिस ठाण्यांमध्ये वेर्णा (२२), पणजी (१८), ओल्ड गोवा व फोंडा (प्रत्येकी १६) आणि आगशी (१२) यांचा समावेश आहे.

Goa road accident statistics 2026
Goa Politics: 'गोवा रक्षण यात्रेने फरक पडणार नाही'; 2027नंतरही भाजपचेच सरकार येणार, विश्वजीत राणेंचा दावा

‘३ डेज, २ नाईट्स’ मानसिकताही कारणीभूत

सोमवार ते शुक्रवार पाच दिवस काम केल्यानंतर अनेकजण शुक्रवार रात्रीपासून विश्रांतीच्या मूडमध्ये असतात. त्याच मानसिकतेत वाहन चालविले जात असल्याने शनिवार-रविवारसह या काळात अपघातांचे प्रमाण वाढते.

पर्यटकही याच कालावधीत मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे ‘३ डेज, २ नाईट्स’च्या मानसिकतेतून होणाऱ्या प्रवासामुळेही अपघात घडत असल्याचे निरीक्षण आहे. येत्या सोमवारपासून गोव्यात वाहतूक सप्ताह सुरू होत असून, त्यादरम्यान या बाबींवर गांभीर्याने विचार केला जाईल, अशी प्रतिक्रिया गोवा कॅनचे निमंत्रक रोलंड मार्टिन्स यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Colvale Goa Accident News
mini bus hits two wheeler in Goa
Porvorim Elevated Road Accident
Goa Tourist Deaths 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com