Thivim Land Scam Dainik Gomantak
गोवा

Thivim Land Scam: थिवी जमीन गैरव्यवहार प्रकरण; सुलेमान सिद्दीकीला जामीन मंजूर, पोलिसांना 'सीएफएसएल' सादर करण्यात अपयश

Thivim Land Forgery Case: थिवी येथील जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुलेमान सिद्दीकी याला मेरशी येथील सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: थिवी येथील जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुलेमान सिद्दीकी याला मेरशी येथील सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. या प्रकरणाचा तपास सुरू होऊन तब्बल चार वर्षे उलटली, तरीही पोलिसांना केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा (सीएफएसएल) अंतिम व निर्णायक अहवाल सादर करता आलेला नाही, यावर बोट ठेवत न्यायालयाने हा निर्णय दिला.

सुलेमानवर म्हापसा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांतर्गत ६ डिसेंबर २०२४ रोजी अटक केली होती. थिवी येथील सव्‍‌र्हे क्रमांक ४५५/७, ४६६/५ आणि ४६६/६ या जमिनींच्या कागदपत्रांमध्ये फेरफार व बनावटगिरी करून हक्क हस्तांतरित केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, सुलेमानने बार्देश उपनिबंधक कार्यालयात सादर केलेली कागदपत्रे बनावट होती, हे सिद्ध करणारा ‘सीएफएसएल’ अहवाल सादर करण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. यापूर्वी अशाच एका अन्य प्रकरणात अहवाल राहिल्यामुळे सुलेमानला जामीन मिळाला होता, याची आठवणही न्यायालयाने करून दिली.

सुलेमानचा जामीन अर्ज यापूर्वी १६ जानेवारी २०२६ रोजी गुन्हेगारी पार्श्वभूमी व पळून जाण्याच्या भीतीपोटी फेटाळला होता. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या एका खटल्यातील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आपल्यावरील पूर्वीच्या गुन्ह्यांची संपूर्ण माहिती न्यायालयासमोर प्रामाणिकपणे सादर केली आहे.

तसेच, फॉरेन्सिक अहवाल वेळेत न आल्यामुळे खटल्याला विलंब होत असून, हा संशयिताच्या जलदगतीने खटला चालण्याच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन आहे, असे सांगत न्यायालयाने हवाला दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT