Goa Theft Case: हरमल येथील लग्नातील आहेर चोरी प्रकरण थंडावले; तपासात प्रगती नसल्याने नाराजी

Mandrem Wedding Theft Case: येथील नाईक कुटुंबीयांच्या लग्नातील आहेराची बॅग लंपास होऊन ४५ दिवस उलटले आहेत.
Mandrem Wedding Theft Case
Goa Theft CaseDainik Gomantak
Published on
Updated on

हरमल: येथील नाईक कुटुंबीयांच्या लग्नातील आहेराची बॅग लंपास होऊन ४५ दिवस उलटले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयिताची प्रतिमा कैद होऊनही चोरट्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या तपासात कोणतीही ठोस प्रगती नसल्याने हे प्रकरण थंडावल्याचे दिसून येत आहे.

या चोरीच्या घटनेत अंदाजे ५ लाख रुपये रोख व ३ लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज, असा एकूण ८ लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. या धाडसी चोरीमुळे मांद्रेत खळबळ उडाली होती. संशयिताची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मात्र, चोरट्यांचा माग काढण्यात मांद्रे पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

Mandrem Wedding Theft Case
Arambol Theft: हरमल परिसरातील चोरी प्रकरणाचा तपास ठप्प, सीसीटीव्ही पुरावे मिळूनही तपास मंदावला

तपासाबाबत मांद्रे पोलिसांकडून नेमकी कोणतीही माहिती मिळत नसल्याने तक्रारदार नाईक कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. नुकतीच नाईक कुटुंबीयांनी पोलिस उपअधीक्षक सलीम शेख यांची भेट घेऊन तपासाची दिशा व प्रगती जाणून घेतली.

मांद्रे पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासात विशेष प्रगती होत नसल्याने हा तपास उत्तर गोवा पोलिस अधीक्षक किंवा अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हाती घ्यावा, अशी मागणी नाईक कुटुंबीयांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Thivim Land Forgery Case
Land Fraud Case
MGP political controversy
Subhash Naik Death Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com