Goa Mine Dainik Gomantak
गोवा

Goa Mine: 'पोटासाठी बँकेत सोनं गहाण ठेवलं, ते सोडवण्यासाठीही पैसे नाही', खाणबंदीचा फटका बसलेल्या ट्रकचालकांची व्यथा

मालकांची सरकारकडे मागणी : कर्ज योजनेचाही विचार व्‍हावा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Mine खाण व्‍यवसाय पावसानंतर तातडीने सुरू करावा. तसेच स्‍थानिक ट्रकमालकांच्‍या हिताचा विचार करून सरकारने 15 वर्षांच्या कालावधीनंतर वाहने स्क्रॅप करण्याच्या नियमातून सूट द्यावी, अशी मागणी करण्‍यात आली आहे.

खाण व्यवसायासाठी मये गाव अग्रेसर असून गोव्यातील जास्त खाणकाम मये, पैरा, शिरगाव, पिळगाव तसेच सभोवतालच्या भागातून चालत होते. मयेतील संपूर्ण जनता गेल्या काही वर्षांत खाण व्यवसायावरच अवलंबून होती, असे म्हटल्यास वावगे नाही.

परंतु खाणबंदीनंतर खाण अवलंबितांवर जणू संक्रातच ओढवली. खाण कामगार, ट्रकमालकांचे जीवन फक्त खाण व्यवसायावरच अवलंबून होते. परंतु या लोकांवर अक्षरशः उपासमारीचीच पाळी आली असून कसेबसे दिवस ढकलत आहेत.

यातून सुटकेसाठी सरकारने तातडीने खाणी सुरू कराव्यात अथवा त्यांचा उदरनिर्वाह चालण्यासाठी अन्य उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी खाण अवलंबितांनी केली आहे. ट्रकमालकांनी सांगितले की, खाणकाम बंद झाल्यापासून त्यांना आर्थिक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

उत्पन्नाचे साधन नाही : ट्रकमालक सुभाष किनळकर

1 सरकारने त्यांना १५ वर्षांच्या कालावधीनंतर वाहने स्क्रॅप करण्याच्या नियमातून सूट दिली पाहिजे; कारण खाणकाम बंद झाल्यानंतर १० वर्षे आधीच वाया गेली आहेत.

2 सप्टेंबर २०१२ मध्ये खाणकाम बंद केले होते. त्यानंतर ट्रक वाहतूक पूर्णपणे बंद आहे. परिणामी उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने ट्रकमालक आर्थिक संकटात सापडले आहेत.

म्हणून आम्ही राज्य सरकारला पुढील १० वर्षांच्या कालावधीसाठी वाहने स्क्रॅप करण्याच्या नियमातून सूट देण्याची विनंती करत आहोत.

3 सध्या ट्रक निष्क्रिय स्थितीत आहेत. ते दुरुस्त करण्यासाठी ट्रकमालकांनी सरकारला त्यांच्यासाठी कर्जाची एक विशेष योजना तयार करण्याची विनंती केली.

ज्यामध्ये ते त्यांचे ट्रक दुरुस्त करू शकतील व खाणकाम पुन्हा सुरू झाल्यावर त्यांना वाहतुकीसाठी ट्रक तयार ठेवण्यास अवधी मिळेल.

खाणव्यवसाय बंद झाल्यानंतर बहुतेक कामगारांना आपला दैनंदिन उदरनिर्वाह चालण्यासाठी सर्व सोन्याचे दागिने बँकेत तारण ठेवावे लागले. मात्र, आता तीव्र आर्थिक कोंडीमुळे दागिने सोडविणे अत्यंत कठीण झाले आहे आणि बँकाही थांबण्यास तयार नाहीत.

आमच्या जास्तीत जास्त सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव केलेला आहे, त्यामुळे खाणी लवकरात लवकर सुरू कराव्यात. - गोविंद लावणीस, कामगार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT