गोव्यातील रिव्हॅल्युशनरी गोवन पार्टीचे अध्यक्ष मनोज परब यांनी गोव्यातील दोन्ही जागांवर लोकसभेसाठी उमेदवार उभा करणार असल्याची घोषणा केली. परब यांच्या पक्षाचा केवळ एक आमदार राज्यात आहे. पण, परबांची गोव्यातील तरूणांमध्ये मोठी क्रेझ असून, ते नेहमी चर्चेत असतात. मागील वर्षी परब यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती.
दरम्यान, मनोज परब यांनी नुकतेच दक्षिणेतील एका राज्याचे मुख्यमंत्री यांची भेट घेतली आहे.
रिव्हॅल्युशनरी गोवन पार्टीचे (RG) अध्यक्ष मनोज परब यांनी तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांची भेट (Manoj Parab And K. Chandrashekar Rao Visit) घेतली. दोघांच्या भेटीचा फोटो सध्या समोर आला आहे.
मुख्यमंत्री चंद्रशेखरराव यांच्या निवासस्थानी परब यांनी भेट घेऊन विविध विषयांवर दिर्घ चर्चा केली. तेलंगणा राज्यातील विविध विकासकामे आणि धोरणात्मक निर्णय याबाबत परब आणि चंद्रशेखरराव यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूक तसेच, चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाचा होत असलेला विस्तार पाहता या भेटीचे विविध राजकीय अर्थ लावले जात आहेत. तसेच, आगमी लोकसभा निवडणूक याचा संबंध या भेटीच्या मागे राजकीय जाणकार लावत आहेत.
चंद्रशेखर राव यांची 'भारत राष्ट्र समिती'
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांची पूर्वीची तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती (BRS) करण्यात आले आहे. चंद्रशेखरराव यांचा पक्ष देशातील विविध राज्यात विस्तार करू पाहत आहे. महाराष्ट्रात पक्षाने नुकतेच खाते उघडले असून, महाराष्ट्रात प्रथमच पक्षाचा सरपंच निवडून आला आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील सावखेडा गावावर (ता.गंगापूर) BRS ने झेंडा फडकवला आहे.
आगामी लोकसभा आणि विविध राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा राज्यातील विकासकामांची जोरदार जाहिरातबाजी देखील पक्षाकडून सर्व प्रादेशिक टीव्हीवरून केली जात आहे. अशात मनोज परब आणि चंद्रशेखरराव यांच्या भेटीचे अनेक अर्थ लावले जात आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.