Goa Electricity : वाळपईत विजेचा घोळ कायम, पाणी पुरवठ्यालाही फटका

वारंवार होणाऱ्या त्रासामुळे उपकरणे नादुरुस्त होण्याच्या प्रकारांत वाढ
Goa Electricity
Goa ElectricityDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Electricity दिवसेंदिवस वाळपई मतदारसंघात विजेचा प्रश्न उग्ररूप धारण करत आहे. सध्या पावसाला सुरवात झाली आहे, त्यामुळे वीज गुल होण्याच्या प्रकारांत अधिक भर पडणार असल्याचे दिसून येत आहे.

या दिवसांत विशेषतः संध्याकाळच्या वेळी विजेचे येणे-जाणे सुरूच आहे. विजेच्या या सततच्या येण्याजाण्यामुळे विजेवर चालणारी अनेक उपकरणे नादुरुस्त होण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे.

Goa Electricity
Goa Monsoon Update: मॉन्सून आला, पडझडीला सुरुवात; अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांनी हाताळल्या 20 घटना

मे महिन्यामध्ये अनेकवेळा वीजप्रवाह खंडित करून वीजवाहिन्यांवरील झाडे छाटण्याची कामे करतात; पण त्याचा काही फायदा होतो का? असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अपुरा कर्मचारी वर्ग असल्याकारणाने या सगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

त्यामुळे वीजमंत्र्यांनी लवकरात लवकर या मतदारसंघात लक्ष घालून ही वीजसमस्या सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांतर्फे होत आहे. ऐन पावसाळ्यात वीज आणि पाणी समस्या उद्‌भवू नयेत,अशी मागणी होत आहे.

Goa Electricity
Goa Police: पोलिसांना माध्यमांशी बोलण्यास मनाई; खात्याने जारी केलाय 'हा' स्थायी आदेश

पाणीपुरवठा ठप्प

वाळपई मतदारसंघातील गुळेली व अन्य पंचायत क्षेत्रांतही विजेचा प्रश्न कायम आहे. वीजप्रवाह खंडित झाल्यावर याचा परिणाम पाणी व्यवस्थापनावर होत असल्याने नळाला पाणी येण्यासाठी विलंब होत आहे. तरी या भागातील विजेचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com