A thief who ran away with cash of eight lakhs from a resort in Colwa was arrested in Delhi Dainik Gomantak
गोवा

Theft in Goa...अखेर ‘त्या’चोरट्याला दिल्लीत अटक

7.5 लाखांच्या रकमेसह संशयिताला आणले गोव्‍यात

दैनिक गोमन्तक

Theft in Goa: कोलवा येथील एका रिसॉर्टमधून आठ लाखांची रोकड घेऊन पळ काढलेल्‍या संशयिताला अवघ्‍या काही तासांतच दिल्‍ली विमानतळावर जेरबंद करण्‍यात आले. दिग्‍विजय सिंग (२२) असे त्याचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील लखनौ येथील असल्याची माहिती कोलवा पोलीसांनी दिली. त्‍याला पकडल्‍यानंतर पोलिसांना त्‍याच्‍याकडे 7.5 लाख रुपयांची रोख सापडली. आज त्‍याला गोव्‍यात आणण्‍यात आले.

संशयिताला ताब्‍यात घेण्‍यासाठी कोलवा पोलिस ठाण्‍याचे एक पथक दिल्‍लीला रवाना झाले हाेते. या प्रकरणात जाॅन डिसौझा हे तक्रारदार आहेत. संशयित प्रशिक्षणार्थी म्‍हणून कोलवा येथील कृष्‍णा बीच रिसोर्ट येथे कामाला होता. पहाटे त्‍याने मालकाला भाऊ आजारी असल्‍याने घरी जायचे आहे पगार द्या, असे सांगितले होते. काही वेळ थांब पगार देतो, असे त्‍याला सांगण्‍यात आले होते.

अन्‌ संशयित पोलिसांच्या हाती

संशयित प्रथम दाबोळी विमानतळावर गेला. मात्र, विमान चुकल्‍यानंतर तो टॅक्‍सीने कळंगुट येथे एका हॉटेलवर गेला. पोलिसांनी तिथे चौकशी केली असता, तो तेथून ‘मोपा’वरून दिल्लीला गेल्‍याचे समजले. त्यानंतर दिल्‍ली पोलिसांना सतर्क केले. संशयित दिल्‍ली विमानतळावर पोहोचताच त्‍याला जेरबंद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

विमान धावपट्टीवर पोहोचताच तांत्रिक बिघाड, प्रवाशांना उतरवून केली पुन्हा तपासणी; 'फ्लाय-91'मध्ये गोवा-पुणे प्रवाशांची गैरसोय

International Tiger Day: 2022 मध्ये गोव्यात 6 वाघ दिसले, पुढे काय..?

Goa Assembly Session:राज्यात अनेक घर फोड्या करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केलेल्या आरोपीला अटक

Bicholim: ..शुभ्र जलधारा कोसळती! डिचोलीतील धबधब्यावर पर्यटकांची गर्दी; आबालवृद्ध लुटताहेत आनंद

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

SCROLL FOR NEXT