Goa Milk Rate: गोव्यात दुधाचे भाव वाढले तूप, पनीर, श्रीखंड दर स्थिर!

संघाचा अहवालातून स्पष्ट: फेब्रुवारी 2020पासून भाव कायम
Goa Milk Rate
Goa Milk RateDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा दूध संघाच्या गेल्या पाच वर्षांतील अहवालात २०२० मध्ये ११ फेब्रुवारी रोजीच्या दरवाढीनंतर १ मे २०२२ आणि २१ जानेवारी २०२३ रोजी दरवाढ झाली आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे तूप, पनीर आणि श्रीखंडाचे दर फेब्रुवारी २०२० मध्ये निश्‍चित झाले ते आतापर्यंत कायम असल्याचे दिसून येते.

Goa Milk Rate
Most Polluted City in Goa: राजधानी पणजी गोव्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर! राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल

दूध संघाविषयी अधिवेशनात आलेल्या प्रश्‍नाला मिळेलेल्या उत्तरात म्हटले आहे की, २०२० मध्ये अर्धा लिटर स्टँडर्ड दूध २५ रुपयांना मिळत होते, २०२२ मध्ये २७, तर आता हे दूध २९ रुपयांना मिळत आहे. हाय फॅटचे एक लिटर दूध २०२० मध्ये ५५ रुपयांना मिळत होते, ते २०२२ मध्ये ६२ आणि आता ते ६७ रुपयांना मिळत आहे.

फेब्रुवारी २०२०मध्ये ११० रुपयांना २०० मिली तूप मिळत होते, ते आताही त्याच दराने मिळत आहे. अर्धा लिटर तूप २७५, पनीर २०० मिली ७०, पनीर ५०० मिली. १७० रुपये दर ठरले होते, ते दर आजही कायम आहेत. त्याशिवाय श्रीखंड (१०० मिली) २५ रुपये, २५० मिली.

६०, ५०० मि.ली. ११५ रुपये, आम्रखंड १०० मिली २५, २५० मिली, ६५ आणि ५०० मिली १२० रुपये दर होता तो आजही कायम आहे. दही, ताक, लस्सी आणि फ्लेवर्ड दूध या पदार्थांचे दर फेब्रुवारी २०२० मध्ये निश्‍चित केले होते, ते २०२३ मध्ये वाढलेले दिसून येतात.

Goa Milk Rate
Goa Illegal Hoarding म्हापशात फक्त दोनच बेकायदेशीर होर्डिंग्स?

गाईचे दूध तीन वर्षांत ३.५ रुपये महागले

गाईचे अर्धा लिटर दूध २२ रुपयांना २०२० मध्ये मिळत होते, ते २०२२ मध्ये २५ रुपये झाले आणि २०२३ मध्ये २७ रुपयांना ते मिळते. टोन्ड दूध २०२० मध्ये अर्धा लिटर २० रुपयांना, २०२२ मध्ये २४ रुपयांना तर २०२३ मध्ये २५.५० रुपयांना ते मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com