Goa Fraud Case : वृद्धाला 36.54 लाखांचा गंडा; गोव्यात जोडप्याविरूद्ध गुन्हा दाखल

नावेली येथील आयवॉन आल्मेदा (60) यांनी या दोघांनी फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती.
Goa Fraud Case
Goa Fraud Case Danik Gomantak
Published on
Updated on

स्टॉक ब्रोकर व इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसे गुंतवून मोठ्या रकमेचा परतावा देतो, असे सांगून सुमारे 36.54 लाखांना गंडा घातल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे कक्षाच्या पोलिसांनी नुवे येथील मायरॉन मावरिस रॉड्रिग्ज (54) व त्याची पत्नी दीपाली परब या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नावेली येथील आयवॉन आल्मेदा (60) यांनी या दोघांनी फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती.

Goa Fraud Case
Goa Milk Rate: गोव्यात दुधाचे भाव वाढले तूप, पनीर, श्रीखंड दर स्थिर!

संशयित मायरॉन रॉड्रिग्ज याने तो स्टॉक ब्रोकर व गुंतवणूक सल्लागार असल्याचे तर संशयित दीपाली परब हिने ती आर्थिक तज्ज्ञ असल्याचे भासवून त्यांची रक्कम गुंतवून त्यावर 25 ते 45 टक्के अधिक रकमेचा परतावा देतो, असे सांगितले. त्यांच्या या आमिषाला तक्रारदार आयवॉन आल्मेदा भुलला.

त्याने सुमारे 49 लाखांची गुंतवणूक संशयितांकडे केली. ही रक्कम मार्च 2023 मध्ये गुंतवण्यात आली. त्यांना काही महिन्यातच त्यावर व्याज देऊन 1 कोटी 19 लाख 439 रुपये मूळ रकमेसह परत केली जाईल, असे सांगितले होते. याप्रकरणी पोलिसांनी प्राथमिक तपास करून गुन्हा नोंदवला आहे. संशयितांना लवकरच चौकशीसाठी बोलावले जाईल,असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Goa Fraud Case
Goa Illegal Hoarding म्हापशात फक्त दोनच बेकायदेशीर होर्डिंग्स?

रक्कम न मिळाल्याने तक्रार

पाच महिने उलटूनही संशयितांनी त्यांच्याकडे संपर्क साधला नाही. त्यामुळे तक्रारदाराला संशय आला. त्याने ही रक्कम परत करण्यास सांगितले असता ती गुंतवण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, तक्रारदाराने ही रक्कम आवश्‍यक असल्याचे सांगितल्यावर 12 लाख 45 हजार 664 रुपये तक्रारदाराच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले. उर्वरित रक्कम संशयितांनी देण्यास टाळाटाळ केल्याने तक्रारदाराने ही तक्रार दाखल केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com