Electricity Minister Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Minister Sudin Dhavalikar: वीज व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार

Sudin Dhavalikar सुदिन ढवळीकर: नागेशीत वीज ट्रान्स्फॉर्मरचे उद्‍घाटन

दैनिक गोमन्तक

Electricity Minister Sudin Dhavalikar: राज्यात वीज व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा व बदल घडवून आणण्यासाठी वीज खाते कार्यरत झाले असून आत्तापर्यंत बाराशे कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. पुढील काळात विविध विकासकामे पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही वीज खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

वीज ग्राहकांना चांगले ते देण्याचा माझा सातत्याने प्रयत्न असून वीज खात्याचे अभियंते तसेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ही कामे पूर्ण होणार आहेत, त्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे चांगले सहकार्य लाभत असल्याचेही ढवळीकर म्हणाले.

नागेशी-बांदोडा येथे नागेश संस्थानच्या जागेत लगतच्या भागातील वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी वीज ट्रान्स्फॉर्मर बसवण्यात आला असून त्याचे उद्घाटन आज (बुधवारी) करण्यात आले.

यावेळी नागेश देवस्थानचे अध्यक्ष दामोदर भाटकर तसेच जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, बांदोडा सरपंच सुखानंद कुर्पासकर, उपसरपंच चित्रा फडते, पंचसदस्य रामचंद्र नाईक, वामन नाईक तसेच इतर पंचसदस्य, वीज खात्याचे कार्यकारी अभियंता सुदन कुंकळ्येकर, सहायक अभियंता केशव गावडे तसेच इतर अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येत्या दोन ते तीन महिन्यात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याच्या कामाची पूर्तता होईल, असेही सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. प्रास्ताविक नागेश संस्थानचे अध्यक्ष दामोदर भाटकर यांनी केले.

वीज समस्या दूर होणार

ढवळीकर म्हणाले, राज्यातील वीज ग्राहकांना सुरळीत आणि व्यवस्थित वीज मिळावी, यासाठी वीज खात्याने अनेक उपक्रम सुरू केले आहेत. त्यात एलटी व एसटी वीजवाहिन्यांचे काम, वीज कंडक्टर्स बदलण्याचे तसेच भूमिगत वीजवाहिनी घालण्याच्या कामाबरोबरच आवश्‍यक त्या ठिकाणी वीज ट्रान्स्फॉर्मर बसवण्यात येत आहेत. नागेशीतील या वीज ट्रान्स्फॉर्मरचा उपयोग स्थानिकांना होणार असून विजेसंबंधीच्या समस्या दूर होण्यास मदतच होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT