CM Pramod Sawant on Children’s Day and Pandit Jawaharlal Nehru
'14 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणारा बालदिन आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यात कसलाच संबंध नाही, तो फक्त बालदिन आहे', असे वक्तव्य मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. त्यांच्या या व्यक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. काल (मंगळवारी) पर्वरी येथे वीर बाल दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या व्यक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'बालदिन म्हणजे 14 नोव्हेंबर तहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. दरवर्षी बालदिनी आपण काय करतो? तर मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करतो किंवा शाळांमध्ये विविध उपक्रम आयोजित केले जातात.
याची दुसरी बाब म्हणजे बालदिनानिमित्त आपण कोणाची आठवण करतो? तर पंडित जवाहरलाल नेहरू. कारण तो नेहरूंचा जन्मदिवस आहे म्हणून. त्या दिवशी आपण नेहरूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतो. बालदिन आणि नेहरू यांच्यात कोणताही संबंध नाही.'
'खरेतर मला या विषयात पडायचे नाही. फक्त महत्वाची बाब म्हणजे नेहरूंचे लहान मुलांवर प्रेम होते म्हणून म्हणून त्यांचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो', असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या या व्यक्तव्यानंतर वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच विषयाच्या अनुषंगाने त्यांनी वीर बाल दिवस साजरा करण्यामागील कारणही स्पष्ट केले. ते म्हणाले की, 'आपण सर्वांनी वीर बाल दिवस का साजरा करायचा हे सांगेन.
फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिपत्रक जारी केल्यामुळे आपण वीर बाल दिवस साजरा करू नये. तर तरुणांमध्ये धर्माबद्दल श्रद्धा आणि प्रेम निर्माण करण्यासाठी आपण ते साजरे केले पाहिजे'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.