Tillari Dam Water Problem: तिळारी धरणाचा कालव्यात उघडणारा दरवाजा उघडण्यात पुण्यातील तंत्रज्ञांना आज (27 डिसेंबर) सकाळी पावणेसहा वाजता यश आले. त्यामुळे आता पर्वरी व साळगावची पाणीटंचाई दूर होणार आहे. हा दरवाजा उघडण्याचे प्रयत्न गेले तीन दिवस सुरू होते.
जलसंपदा खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी हे काल सकाळी तिळाऱी धरणाकडे रवाना झाले. ते तेथे पुण्यातील तंत्रज्ञांकडून धरणाचा कललेला दरवाजा वर उचलण्याच्या प्रयत्नांवर देखरेख करत होते. तिळारी धरणाचे कार्यकारी अभियंता जाधव आणि बदामी हे रात्री उशिरापर्यंत त्या तंत्रज्ञांसोबतच होते. शेवटी अथक प्रयत्नांनंतर हा दरवाजा आता उघडला आहे.
कालव्याच्या या समस्येमुळे मागील काही दिवसांपासून बार्देश तालुक्याच्या काही भागांत पाणीटंचाई जाणवत होती. परिणामी सार्वजनिक बांधकाम खाते टॅंकरने पाणीपुरवठा करत होते. टंचाईच्या भीतीने घराघरांत पाणी साठवून ठेवण्यात आले होते. आता लवकरच पाणी पुरवठा पूर्ववत होईल, असे सांगण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.