Theft In Goa Dainik Gomantak
गोवा

ऐन चतुर्थी काळात चोरट्यांचा धुमाकूळ! वार्कात पाच तर मडगावात एक दुकान फोडले

Goa Theft: मडगावात रोकड तसेच मिठाई लंपास; वार्का फार्मसीसह पाच दुकाने फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्‍टी,: वार्का येथील फार्मसीसह पाच दुकाने चाेरट्यांनी फोडून रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. मडगावातही एका मिठाईच्‍या दुकानाचे शटर उघडून रोख रक्कम व दुकानातील मिठाई चोरून नेली.

सर्व लोक गणेशोत्सवाच्या तयारीत व्यस्त असतानाच मडगावात पालिका इमारतीच्या मागील बाजूला पोलिस स्थानकापासून जवळच असलेल्‍या पंजाबी लस्सी या मिठाई दुकानाचे शटर गुरुवारी रात्री चोरट्यांनी दुकानातील पाच हजारांची रोकड तसेच मिठाई लंपास केली.

दुसरीकडे वार्का, फात्राडे परिसरातील फार्मसी व वाईन शॉप अशा पाच दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केले. दोघा चोरट्यांनी दुचाकीवरून येत शटर उघडून दुकानात प्रवेश करत चोरी केल्याचे एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. अपोलो फार्मसीसह आणखी एक फार्मसीला चोरट्यांनी लक्ष्य केले. एका फार्मसीतून १ लाख २५ हजार तर अपोलो फार्मसीतून ४७ हजारांची रोख रक्कम, वाईन शॉपमधून काही साहित्याची चोरी चोरट्यांनी केली.

पोलिस गस्त वाढवा!

याप्रकरणी पुढील तपास केला जात आहे. उत्सवाच्या काळात चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांकडून गस्तीत वाढ करावी, अशी मागणी नागरिकांकडून व दुकानदारांकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT